चोरट्याकडून चोरीच्या २४ दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:20 AM2021-06-02T04:20:28+5:302021-06-02T04:20:28+5:30

कोल्हापूर : कमी किमतीत दुचाकी विक्रीच्या संशयावरून पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीकडून तब्बल २४ दुचाकी चोरल्याचे उघड झाले. रणजित रवींद्र ...

24 stolen two-wheelers seized from thieves | चोरट्याकडून चोरीच्या २४ दुचाकी जप्त

चोरट्याकडून चोरीच्या २४ दुचाकी जप्त

Next

कोल्हापूर : कमी किमतीत दुचाकी विक्रीच्या संशयावरून पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीकडून तब्बल २४ दुचाकी चोरल्याचे उघड झाले. रणजित रवींद्र गुरव (वय ४५, रा. प्लॉट नं. १८, पद्माराजे हौसिंग सोसायटी, उजळाईवाडी, ता. करवीर) असे चोरट्याचे नाव आहे. त्याने कोल्हापुरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व सरकारी कार्यालय परिसरातून बहुतांशी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १४ मोपेड व १० मोटारसायकल अशा एकूण चोरीच्या २४ दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहर व परिसरातून दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस दुचाकी चोरट्यांचा माग काढत होते. त्यावेळी रणजित गुरव हा चोरीची दुचाकी विक्रीसाठी टेंबलाई रेल्वेफाटक उड्डाणपुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून गुरव याला विनानंबर दुचाकीसह पकडले. चौकशीत त्याने ती दुचाकी शाहूपुरी पोलिसांच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याला ‘खाक्या’ दाखवला असता, एकूण २४ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या एकूण ७ लाख २० हजार रुपये किमतीच्या २४ दुचाकी जप्त केल्या.

पोलीस संदीप कुंभार यांचे कौशल्य

चोरटा रणजित गुरव हा कसबाबावडा मार्गावरील मध्यवर्ती कार्यालय तसेच सरकारी कार्यालयातून दुचाकी चोरून त्या कमी किमतीत विकत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार संदीप कुंभार यांना मिळाली. त्याआधारे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनानुसार पो. नि. तानाजी सावंत यांनी सहा. पो. नि. सत्यराज घुले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुन्हे उघड

- शाहूपुरी पोलीस : १३

- जुना राजवाडा पोलीस : ०६

- राजारामपुरी पोलीस : ०३

- लक्ष्मीपुरी पोलीस : ०१

- गोकुळ शिरगाव पोलीस : ०१

फोटो नं. ०१०६२०२१-कोल- पोलीस०१

ओळ : कोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या २४ दुचाकी हस्तगत केल्या.

===Photopath===

010621\01kol_5_01062021_5.jpg

===Caption===

ओळ : कोल्हापूरात स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने चोरट्याला अटक करुन त्याच्याकडून चोरीच्या २४ दुचाकी हस्तगत केल्या.

Web Title: 24 stolen two-wheelers seized from thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.