कोल्हापूर जिल्ह्यात कर्जमाफीचे २४२२ आॅनलाईन अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 06:34 PM2017-08-08T18:34:48+5:302017-08-08T18:39:02+5:30
कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातून २४२२ आॅनलाईन अर्ज जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. शेतकºयांनी विकास संस्थांच्या माध्यमातून सुमारे १० हजार आॅफलाईन अर्ज भरले असून, ९५० ‘नेटझीन’ मशीन कनेक्ट होत नसल्याने अर्ज भरण्याची गती मंदावली आहे. येत्या दोन दिवसांत कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर दिवसाला १० हजारांपर्यंत अर्ज भरून घेतले जाऊ शकतात.
कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातून २४२२ आॅनलाईन अर्ज जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. शेतकºयांनी विकास संस्थांच्या माध्यमातून सुमारे १० हजार आॅफलाईन अर्ज भरले असून, ९५० ‘नेटझीन’ मशीन कनेक्ट होत नसल्याने अर्ज भरण्याची गती मंदावली आहे. येत्या दोन दिवसांत कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर दिवसाला १० हजारांपर्यंत अर्ज भरून घेतले जाऊ शकतात.
सरकारने २००९ पासून थकबाकीदार असणाºया शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नियमित कर्ज परतफेड करणाºयांना २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानासाठी शासनाने निकष लावले असून, या निकषांत बसणाºया शेतकºयांनाच याचा लाभ होणार आहे. यासाठी पात्र शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले आहेत.
जिल्ह्यात १११० महाआॅनलाईन- सेतू, सीएससी व ग्रामपंचायत सेवा केंद्रे आहेत. सुरुवातीच्या काळात ‘मंत्रा’ची दहा मशीन उपलब्ध करून दिली होती, त्यामुळे आॅनलाईन अर्जांची गती कमी आहे. आतापर्यंत २४२२ आॅनलाईन, तर १० हजार आॅफलाईन अर्ज दाखल झाले आहेत. येत्या तीन-चार दिवसांत फॉर्म भरून घेण्यास गती येईल.
काय आहे अडचण?
शेतकºयांचा कर्जमाफीच्या आॅनलाईन फॉर्ममध्ये आधार क्रमांक भरावा लागतो. तो भरल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर ‘ओटीपी’ (तात्पुरता पासवर्ड) येतो. हा पासवर्ड भरला की लगेच त्या शेतकºयाची माहिती भरता येते; पण अनेक शेतकºयांचे स्वत:चे मोबाईल नाहीत. आधार कार्ड काढताना त्यांनी दिलेला मोबाईल क्रमांक त्यांच्या लक्षात नसल्याने गोची झाली आहे.
नेटझीन सक्रिय झाल्यानंतर...
नेटझीन मशीनला आधार क्रमांक व मोबाईलची गरज भासणार नाही. थेट संबंधित शेतकºयांचे थम्ब (अंगठ्याचा ठसा) घेतल्यानंतर त्याचा संपूर्ण डाटा तत्काळ खुला होणार आहे. त्यामुळे माहिती भरण्याचे काम गतीने होणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत ‘नेटझीन’ची कनेक्टिव्हिटी होईल, असा अंदाज आहे.
केंद्र आॅनलाईन अर्ज
सीएससी १२००
महा-ई सेवा ८००
ग्रामपंचायत ४२२
एकूण - २४२२
पात्र शेतकºयांकडून आॅफलाईन अर्ज भरून घेण्याची सूचना विकास संस्थांना दिलेली आहे. परिपूर्ण अर्ज घेऊन शेतकरी जवळच्या केंद्रावर जाऊन आॅनलाईन माहिती भरू शकेल.
- अरुण काकडे,
जिल्हा उपनिबंधक