जिल्ह्यात २४४२ सार्व. गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:25 AM2021-09-21T04:25:28+5:302021-09-21T04:25:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये घरगुती गणेश विसर्जनासाठी पर्यावरणपूरक पध्दतीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असतानाच, २ ...

2442 in the district. Environmentally friendly immersion of Ganesha idols | जिल्ह्यात २४४२ सार्व. गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

जिल्ह्यात २४४२ सार्व. गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये घरगुती गणेश विसर्जनासाठी पर्यावरणपूरक पध्दतीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असतानाच, २ हजार ४४२ सार्वजनिक गणेश मूर्तींचेही याचपध्दतीने विसर्जन करण्यात आले; तर घरगुती ६०४ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या.

जिल्हा परिषद गेली सहा वर्षे पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी पाणी व स्वच्छता विभागाच्या पुढाकारातून उत्सवाआधीच महिनाभर जनजागरण मोहीम राबवण्यात येते. पहिल्या वर्षीपासूनच या मोहिमेला जिल्ह्यातील जागरूक नागरिकांनी चांगला प्रतिसाद देऊन पर्यावरण उत्तम राखण्यामध्ये आपलाही खारीचा वाटा उचलला.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा हा पॅटर्न आता रूढ झाला असून, त्यामुळेच घरगुती २ लाख ४२ हजार मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन गेल्या आठवड्यात करण्यात आले, तर ५०० टन निर्माल्य संकलन करण्यात आले. अनंत चतुर्दशीदिवशीही घरगुती ६०४, तर सार्वजनिक २४४२ गणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पध्दतीने करण्यात आले; तर साडेसहा टन निर्माल्य संकलन करण्यात आले. यासाठी ६७ घंटागाड्या आणि ३६२ ट्रॅक्टर्सचा वापर करण्यात आला.

चौकट

तालुकावार सार्वजनिक मूर्ती विसर्जन

आजरा ५३, भुदरगड २१५, चंदगड १०५, गडहिंग्लज ९८, गगनबावडा ६०, हातकणंगले ४१६, कागल ३८२, करवीर ४२३, पन्हाळा ५०६, राधानगरी २८७, शाहूवाडी १४५, शिरोळ २१

कोट

जिल्हा परिषदेच्या आवाहनाला गावोगावच्या ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची परंपरा दृढ होत असल्याचे समाधान आहे.

राहुल पाटील,

अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर

Web Title: 2442 in the district. Environmentally friendly immersion of Ganesha idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.