चोवीस तासात तब्बल २४९ मिली मिटर पाऊस ; तुळशी ६६ टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 08:11 PM2020-08-05T20:11:11+5:302020-08-05T20:19:50+5:30
गेल्या दोन दिवसापासून धामोड परिसरात पावसाने दमदार सुरवात केली आहे . त्यामुळे या दोन दिवसात तुळशी धरणात ११ टक्के इतका पाणी साठा वाढला आहे .
श्रीकांतऱ्हायकर
धामोड : गेल्या दोन दिवसापासून धामोड परिसरात पावसाने दमदार सुरवात केली आहे. त्यामुळे या दोन दिवसात तुळशी धरणात ११ टक्के इतका पाणी साठा वाढला आहे.
गेल्या २४ तासात धरण परिसरात २४९ मिलीमिटर इतक्या उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे . तर दुसऱ्या दिवशी दिवसभरात १४१ मिलीमिटर पाऊस पडला पा. हे प्रमाण असेच राहिल्यास आठ ते दहा दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरेल.
जुन महिन्यात किरकोळ पाऊस वगळता गेल्या २० ते २५ दिवसापासून पावसाने चांगलीच ओढ दिली होती . त्यामुळे रोप लागणीची कामे खोळंबली होती . पण गेल्या दोन दिवसापासून पावसाने दमदार सुरवात केली आहे . त्यामुळे परिसरातील खामकरवाडी, केळोशी येथील ओव्हरफ्लो झालेल्या लघू पाटबंधारे प्रकल्पातून मोठया प्रमाणात पाणी नदीपात्रात प्रवाहीत होत आहे.
केळोशी प्रकल्पातील अतिरीक्त पाणी थेट तुळशी जलाशयात जात असल्याने तुळशीची पाणी पातळी झपाट्याने वाढते आहे. तर खामकरवाडी प्रकल्पाचे पाणी लोंढा, नाल्याद्वारे तुळशी नदीपात्रात जात असल्याने नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
गेल्या २४ तासात तर धामोड परिसरात पावसाने विक्रमी नोंद केली असून २४९मिली मिटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे धरण साठयात झपाट्याने वाढ होत असुन केवळ दोन दिवसात ११ टक्के पाणी साठा वाढल्याचे शाखा अभियंता विजयराव आंबोळे यांन सांगीतले.