जयसिंगपुरात २४ ला ज्योतिष संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:23 AM2021-01-18T04:23:06+5:302021-01-18T04:23:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जयसिंगपूर : मानवी जीवनात यशस्वी होण्याकरिता ज्योतिष शास्त्र गरजेचे आहे. भोंदूगिरीला समूळ नष्ट करण्याकरिता जयसिंगपूर येथे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर : मानवी जीवनात यशस्वी होण्याकरिता ज्योतिष शास्त्र गरजेचे आहे. भोंदूगिरीला समूळ नष्ट करण्याकरिता जयसिंगपूर येथे बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळाच्यावतीने दिनांक २४ ते २६ जानेवारी दरम्यान विभागीय ज्योतिष संमेलन होणार असल्याची माहिती नंदकिशोर जकातदार यांनी दिली. हे संमेलन सिद्धेश्वर मंदिर यात्री निवास येथे होणार आहे. दिनांक २४ जानेवारीला क्रांती चौकातून ज्योतिष प्रसार दिंडीला प्रारंभ होणार आहे. दिनांक २५ व २६ जानेवारीला सर्वांसाठी ज्योतिष शास्त्राची सखोल माहिती देणारे पोस्टर प्रदर्शन, त्याचबरोबर संशोधनात्मक निबंध अवलोकनार्थ ठेवण्यात येणार आहे. तसेच नामवंत ज्योतिर्विद यांची व्याख्याने आयोजित केली आहेत. ग्रंथदिंडीचे उद्घाटन राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाचे उद्घाटन नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांच्या हस्ते तर पोस्टर्स प्रदर्शनाचे उद्घाटन दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे जकातदार यांनी सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष अॅड. मालती शर्मा, संयोजन समितीचे अध्यक्ष आण्णा भोसले, उपाध्यक्ष ब्रह्मविलास पाटील, कार्याध्यक्ष डॉ. रावसो परिट आदी उपस्थित होते.