आजऱ्यात रस्त्यावरील अपघातामुळे जातो २५ ते ३० जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:26 AM2021-02-24T04:26:30+5:302021-02-24T04:26:30+5:30

सदाशिव मोरे आजरा : आजरा, गडहिंग्लज, उत्तूर रस्त्यावर गतिरोधक नसल्याने सुसाट वेगाने वाहने धावत आहेत. रस्त्याचा अंदाज येत नसल्याने ...

25 to 30 people are killed in road accidents in Ajmer | आजऱ्यात रस्त्यावरील अपघातामुळे जातो २५ ते ३० जणांचा बळी

आजऱ्यात रस्त्यावरील अपघातामुळे जातो २५ ते ३० जणांचा बळी

Next

सदाशिव मोरे

आजरा : आजरा, गडहिंग्लज, उत्तूर रस्त्यावर गतिरोधक नसल्याने सुसाट वेगाने वाहने धावत आहेत. रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच रस्त्यावर प्रतिवर्षी २५ ते ३० जणांचा नाहक बळी जात आहे. गतिरोधकाचा अभाव व वेगावर नियंत्रण नसल्याने अपघातात अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त होत आहेत.

कोकण व गोव्याचे प्रवेशद्वार आजरा आहे. सर्वच वाहने आजऱ्यामार्गे कोकणात जातात. दोन वाहने जाण्यासाठी अरूंद पण चांगला झालेला गडहिंग्लज-उत्तूर रस्ता सध्या अपघाताला निमंत्रण देत आहेत. दररोज या रस्त्यावर मोटारसायकलसह मोठ्या वाहनांचे अपघात होत आहेत. सुसाट वेगाने जाणारी वाहने, वेगावर अजिबात नियंत्रण नाही व रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. मोटारसायकलस्वार तर हेल्मेटच घालत नाहीत. पोलीसही हेल्मेटऐवजी गाडीची कागदपत्रे पाहून दंड करतात. त्यामध्येही आर्थिक चिरीमिरी होऊन प्रकरणे मिटवली जातात. वळणावळणाचे रस्ते असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जवळपास ४४ ते ५० वळणे असून वाहनधारकांना ती लक्षात येत नाहीत. उसाने भरलेल्या ट्रॅक्टरमुळेही अपघात होतात. आजरा-गडहिंग्लज-उत्तूर-आंबोली रस्त्यावर प्रतिवर्षी २५ ते ३० जणांना आपला जीव गमवावा लागत आहे. मोटारसायकलीवरील युवकांचे लायसन्सही नसणे तसेच बेदरकारपणे वाहने चालवून अपघाताला निमंत्रण देत आहेत. वेगावरील नियंत्रणाबरोबर गतिरोधकाची गरज आहे. चार दिवसांपूर्वी मोटारसायकल अपघातात झालेला दोघांचा मृत्यू तालुकावासीयांचे मन हेलावणारा होता. मात्र, दोघांच्याही डोक्याला हेल्मेट नव्हते. आता सर्वांनीच वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

-------------------------

* प्रतिक्रिया

अरूंद रस्ता, वेगमर्यादेचे पालन नाही, रस्त्याच्या मधोमध पांढरे पट्टे पाहिजेत. पोलिसांच्या कारवाईबरोबर स्वयंशिस्तही गरजेची आहे तरच अपघातांचे प्रमाण कमी होईल.

- बालाजी भांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक

Web Title: 25 to 30 people are killed in road accidents in Ajmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.