माणगांव येथे 25 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी, 20 एकर ऊस थोडक्यात वाचला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 06:50 PM2022-10-30T18:50:41+5:302022-10-30T18:51:36+5:30
अभय व्हनवाडे माणगांव: येथील सरळी नामक शेतातील 25 एकर ऊसाला आग लागल्याने शेतकऱ्याचे जवळपास 5 लाखांचे नुकसान झाले. आग ...
अभय व्हनवाडे
माणगांव: येथील सरळी नामक शेतातील 25 एकर ऊसाला आग लागल्याने शेतकऱ्याचे जवळपास 5 लाखांचे नुकसान झाले. आग लागल्याची बातमी गावात पसरताच शेतकऱ्याने लगतचा ऊस तोडला आणि 20 एकर उसाला आगीच्या भक्ष्यस्थानातून वाचवले.
आर.जे. पाटील, शमशुद्दिन जमादार, कुमार पाटील, अभिजीत मुगुळखोड, अशोक मुगुळखोड, सिकंदर जमादार, ईलायात जमादार, मीरासो जमादार, मोमीन जमादार, सिकंदर जमादार, शब्बीर जमादार, दस्तगीर जमादार , नजीर जमादार , हारून जमादार, रफिक जमादार, प्रकाश मगदूम, प्रभू हेरवाडे, अरुण मगदूम, शौकत जमादार, झहीर जमादार, प्रदीप मगदूम यांच्या मालकीची ही शेती होती.
आज (दि30) रोजी दुपार 2च्या दरम्यान शेतातील ऊसाला आग लागली. आग लागल्याची बातमी कळताच शेतकरी आगीच्या ठिकाणी पोहचले. आग लागलेल्या ऊसालगत आणखी 20 एकर उस क्षेञ होते. या ऊसाला आग लागू नये, यासाठी शेतकऱ्यांनी लगतच उस तोडून टाकले. यामुळे उस वाचला अन्यथा 45 एकर उस आगीत सापडला असता. आग नेमक्या कोणत्या कारणाने लागले हे समजू शकले नाही.