गडमुडशिंगीत लोकसहभागातून उभारले पंचवीस बेडचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:24 AM2021-05-26T04:24:19+5:302021-05-26T04:24:19+5:30
गावात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रुग्णांची सोय व्हावी यासाठी लोकसहभागातून पंचवीस बेडचे कोविड सेंटर न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या ...
गावात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रुग्णांची सोय व्हावी यासाठी लोकसहभागातून पंचवीस बेडचे कोविड सेंटर न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या इमारतीमध्ये सुरू केले आहे. यावेळी ग्रा.पं. सदस्य रावसाहेब पाटील, सुदर्शन पाटील, अशोक दांगट, दिलीप थोरात, डॉ. शरद शिंदे, माजी पं. स. सदस्य सचिन पाटील, शिवसेनेचे करवीर उपतालुकाप्रमुख पोपट दांगट, सर्कल अर्चना गुळवणी, तलाठी संतोष भिऊंगडे, अरुण शिरगावे, संतोष कांबळे, राहुल गिरुले, गीतेश डकरे, संजय सोनुले, पिंटू सोनुले, पप्पू नेर्ले, दत्तात्रय नेर्ले उपस्थित होते.
फोटो : २५ गडमुडशिंगी कोविड सेंटर
गडमुडशिंगी येथे लोकसहभागातून उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन सरपंच अश्विनी शिरगावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच तानाजी पाटील, पं. स. समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे, जितेंद्र यशवंत, ग्रा.पं. सदस्य रावसाहेब पाटील, आदी उपस्थित होते. (छाया - दीपक गुरव)