राजे फाउंडेशन मार्फत २५ बेडचे कोविड सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:26 AM2021-04-28T04:26:31+5:302021-04-28T04:26:31+5:30
या केंद्रावर सहा ऑक्सिजन बेड व १९ जनरल बेडसह एकूण पंचवीस बेडची सुविधा उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास ती ...
या केंद्रावर सहा ऑक्सिजन बेड व १९ जनरल बेडसह एकूण पंचवीस बेडची सुविधा उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास ती पन्नास बेडपर्यंत वाढविण्यात येणार आहे,असेही यावेळी घाटगे म्हणाले. या ठिकाणी अद्यावत रुग्णवाहिका व अग्निशामन सेवाही उपलब्ध केल्या आहेत. यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील ,वैद्यकीय अधिकारी महेंद्र पाटील ,तुषार भोसले यांच्यासह शाहू ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोट.
‘कोरोनाचा वाढता प्रभाव,व बेडची कमतरता पाहून तातडीने याबाबत निर्णय घेतला. आजपासून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
कारखाना कार्यक्षेत्रासह ,भागातील नागरिकांची सोय या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्ससह सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना निश्चित दिलासा मिळेल.’
समरजित घाटगे ( अध्यक्ष शाहू ग्रुप )
छायाचित्र- २७ कागल
कागल येथे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन मार्फत सुरू केलेल्या अद्यावत कोविड सेंटरचे उद्घाटन समरजित घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी मंत्री विरकुमार पाटील, अमरसिंह घोरपडे व सर्व संचालक उपस्थित होते.