माने कन्या शाळेस २५ सायकली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:28 AM2021-02-09T04:28:21+5:302021-02-09T04:28:21+5:30
कोल्हापूर : कुरुंदवाड येथील विमलादेवी खंडेराव माने कन्या माध्यमिक शाळेस खास मुलींसाठी सायकल बँक उपक्रम राबविण्याकरिता डाॅ. सचिन ...
कोल्हापूर : कुरुंदवाड येथील विमलादेवी खंडेराव माने कन्या माध्यमिक शाळेस खास मुलींसाठी सायकल बँक उपक्रम राबविण्याकरिता डाॅ. सचिन कामत यांच्या स्मरणार्थ जवाहर नवोदय विद्यालयाची तिसरी बॅच व निसर्ग सायकल मित्र परिवारातर्फे शनिवारी (दि. ६) पंचवीस सायकली भेट देण्यात आल्या. अध्यक्षस्थानी मसणू कामत होते.
निसर्ग सायकल मित्र परिवाराने कुरुंदवाड परिसरातील मुलींना शाळेत पायी येण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. ही बाब जाणून घेऊन शाळेमार्फत सायकल बँक तयार करण्यासाठी प्रवृत्त केले. दहावीपर्यंतच्या मुलींना दूरच्या अंतरावरून पायी यावे लागत होते. ही बाब जाणून शाळेत सायकल बँक तयार करून त्या सायकली त्यांना दहावीपर्यंत वापरता याव्यात. त्यानंतर पुन्हा त्या विद्यार्थिनी त्या सायकली शाळेकडे जमा करतील. अशी बँकेची व्यवस्था आहे. यावेळी निसर्ग सायकल मित्रचे सुनील पाटील यांनी सायकल चालविण्याचे फायदे विषद केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पटवर्धन, शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडचे अध्यक्ष शरद पराडकर , ओंकार बोगे, जयश्री जोशी, सी. व्ही. रमणराव, राहुल वडिंगेकर, विलास जमदाडे, रवींद्र आडके, तुषार कोरवी, विक्रांत पाटील, किरण देशपांडे, स्वप्नील घाटगे, हर्षद कांबळे, विकास कांबळे, राधिका शिंदे, मनीषा वारके, कृष्णकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : ०८०२२०२१-कोल-सायकल
ओळी : कुरुंदवाड येथील विमलादेवी खंडेराव माने कन्या माध्यमिक विद्यालयात सायकल बँक सुररू करण्यासाठी डाॅ. सचिन कामत यांच्या स्मरणार्थ निसर्ग सायकल मित्र परिवार व जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांनी पंचवीस सायकली भेट दिल्या.