आयआरबी रस्ते दुरुस्तीसाठी २५ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:26 AM2021-03-23T04:26:27+5:302021-03-23T04:26:27+5:30

आयआरबीने केलेल्या रस्त्यांना आता दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. दहा वर्षात जलवाहिन्या दुरुस्तीच्या नावाखाली शहरातील काही भागात सिमेंटने ...

25 crore proposal for repair of IRB roads | आयआरबी रस्ते दुरुस्तीसाठी २५ कोटींचा प्रस्ताव

आयआरबी रस्ते दुरुस्तीसाठी २५ कोटींचा प्रस्ताव

Next

आयआरबीने केलेल्या रस्त्यांना आता दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. दहा वर्षात जलवाहिन्या दुरुस्तीच्या नावाखाली शहरातील काही भागात सिमेंटने केलेले रस्ते ब्रेकर लावून खुदाई करण्यात आली; परंतु ते रस्ते नंतर महापालिकेला दुरुस्त करता आले नाहीत. सिमेंटच्या रस्त्यालगत असलेले डांबरी रस्ते दोन ते तीन इंचाने खचले आहेत, त्याचीही दुरुस्ती करता आलेली नाही; परंतु हे नादुरुस्त झालेले रस्ते दुरुस्ती करणे आवश्यक बनले आहे.

या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अंदाजे २५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे आणि इतका खर्च महापालिकेला पेलवणारा नाही. म्हणून नगरविकास विभागाने एवढा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीकरिता पाठविण्यात आला आहे. यावर नगरविकास विभाग सकारात्मक विचार करील, अशी अपेक्षा आहे.

Web Title: 25 crore proposal for repair of IRB roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.