पूरबाधितांसाठी २५ किलो धान्य मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:21 AM2021-07-25T04:21:27+5:302021-07-25T04:21:27+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांसाठी दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ, पाच किलो तूर डाळ व पाच लिटर केरोसीन ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांसाठी दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ, पाच किलो तूर डाळ व पाच लिटर केरोसीन मोफत देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला असून, पुरवठा विभागाकडील शिल्लक धान्यातून याचे तातडीने वितरण करण्याची सूचना देण्यात आली आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. घर पाण्यात बुडाल्याने संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय झाला असून, केंद्राकडून याची मागणी करण्यात येणार आहे. तूर डाळ जिल्हा प्रशासनाने स्थानिक बाजारातून खरेदी करावी व त्यासाठी आपत्ती व्यवस्थापनमधील निधी वापरावा, अशी सूचना यात करण्यात आली आहे. तर केरोसीनसाठी ऑईल कंपन्यांना सूचना करण्यात आली आहे.
----