२५ कोटी मत्स्यबीज निर्मितीचे लक्ष

By admin | Published: June 9, 2015 12:51 AM2015-06-09T00:51:25+5:302015-06-09T00:51:25+5:30

भंडारा जिल्ह्यात मत्स्योत्पादनाला प्रचंड वाव आहे. त्यामुळे यावर्षी मत्स्यव्यवसाय विभागाने जिल्ह्यातील ओलितबांध, ...

25 million fish seed production target | २५ कोटी मत्स्यबीज निर्मितीचे लक्ष

२५ कोटी मत्स्यबीज निर्मितीचे लक्ष

Next

कुरुंदवाड : चालू गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला एफआरपीप्रमाणे दर देण्यासंदर्भात शासनाला २० जूनची डेडलाईन दिली आहे, अन्यथा २२ जूनपासून पुण्याच्या साखर संकुलासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल. मात्र, याठिकाणी जाण्यास पोलिसांनी मज्जाव केल्यास जिथे अडवतील त्याच ठिकाणी बेमुदत उपोषण करण्यात येईल. त्यासाठी शासनाला कोणते आंदोलन स्वीकारायचे आहे, हे त्यांनीच ठरवावे, असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला.
नांदणी (ता. शिरोळ) येथील गांधी चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालंदर पाटील होते. सुमारे एक कोटी ३८ लाख रुपये खर्चाच्या गावातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, कॉँक्रिटीकरण, जिनसेन मठाच्या ४३ लाख रुपये खर्चाच्या यात्री निवासाच्या कामाचे उद्घाटन खा. शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकर मादनाईक यांची भाषणे झाली. समाजकल्याण विभाग व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील लाभार्थ्यांना ९० सायकली व ५० शिलाई मशीनचे वाटप खा. शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषद बांधकाम सभापती सीमा पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा अपराज, युनूस पटेल, उपसभापती वसंत हजारे, विश्वास बालिघाटे, बंडू पाटील, विठ्ठल मोरे, रावसाहेब भगाटे, आदी उपस्थित होते.

आंदोलनाशिवाय न्याय नाही
यावेळी खा. शेट्टी म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाचे दाम घेण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाणार आहे. सरकार कोणाचेही असो, आंदोलनाशिवाय शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा नव्या जोमाने हक्काच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले.

Web Title: 25 million fish seed production target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.