सत्तर वर्षात अडीच लाख मेगावॅट वीज

By admin | Published: December 24, 2014 11:16 PM2014-12-24T23:16:40+5:302014-12-25T00:06:16+5:30

महावितरण कंपनी : मागणी वाढल्याने वीजनिर्मितीही वाढली

2.5 million MW electricity in the seventy years | सत्तर वर्षात अडीच लाख मेगावॅट वीज

सत्तर वर्षात अडीच लाख मेगावॅट वीज

Next

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -भारतात २४ जुलै १८७९ला वीज सुरु झाली. पीडब्ल्यू फेल्युरी आणि कंपनीने वीजप्रयोग दाखवला. ३१ डिसेंबर १९४७ला १३६२ मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. आता ३० नोव्हेंबर २0१४ अखेर २ लाख ५५ हजार १३ मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होऊ लागली आहे. मागणी वाढल्यामुळे वीजनिर्मितीही वाढली आहे. गेल्या ७७ वर्षांचा आढावा घेतला असता १३६२ वरुन २ लाख ५५ हजार १३ मेगावॅट इतकी वीजनिर्मिती क्षमता वाढली आहे.
मेसर्स किलप आणि कंपनीने कलकत्ता शहरात ७ जानेवारी १८९७ला वीज वितरणाचा परवाना मिळविला. पुढे कलकत्ता इलेक्ट्रिक सप्लाय कॉर्पोरेशन असे त्याचे नामकरण झाले. बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय व ट्रॉम्ब्वे कंपनीतर्फे १८८२ला मुंबईत विजेचा प्रयोग दाखविण्यात आला. तद्नंतर १९०५ला मुंबईत ट्रामसाठी वीजपुरवठा सुरु झाला. १८९७मध्ये दार्जिलिंग नगरपालिकेने सीद्रा कोम येथे पाण्यापासून वीज निर्मिती सुरु केली. मुंबईमध्ये विजेवरची पहिली रेल्वेगाडी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला मार्गावर १९२५मध्ये धावली. त्यानंतर १९३१मध्ये मीटरगेज मार्गावर मद्रास ब्रीज ते तंबरम् मार्गावर धावली. ३१ डिसेंबर १९४७ रोजी भारतामध्ये प्रत्यक्ष वीजनिर्मितीला प्रारंभ झाला. सुरुवातीला १३६२ मेगावॅट इतकी सुरुवातीला वीजनिर्मिती होत होती.
साहजिकच ग्राहकांकडून विजेची मागणी वाढल्यामुळेच वीजनिर्मिती वाढविण्यात आली. मागणीनुसार महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात येत आहे. फिडरनिहाय भारनियमन सुरु केल्याने सध्या मागणी व पुरवठ्यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्या फिडरवर वीजगळती अधिक व वीजबिल वसुली कमी आहे, त्या फिडरवर प्राधान्याने भारनियमन सुरु आहे. संबंधित पॅटर्नचा अवलंब महाराष्ट्रालगतची अन्य राज्येदेखील करु लागली आहेत.
नोव्हेंबरअखेर संपूर्ण देशामध्ये १ लाख ४८ हजार १६६ मेगावॅट इतकी विजेची मागणी नोंदविण्यात आली होती. फिडरनिहाय भारनियमन करुन महावितरणकडून १ लाख ४१ हजार १६० मेगावॅट इतका वीजपुरवठा करण्यात आला आहे. उत्तरी क्षेत्रातील राज्यांकडून ५१ हजार ९७७ मेगावॅट विजेची मागणी करण्यात आली असता ४७ हजार ६४२ मेगावॅट वीजपुरवठा करण्यात आला आहे. पश्चिमी क्षेत्रातील राज्यांकडून ४४ हजार १६६ मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली होती. पैकी ४२ हजार ७४७ इतका विजेचा पुरवठा करण्यात आला आहे. दक्षिण क्षेत्रातील राज्यांकडून ३९ हजार ९४ मेगावॅट विजेची मागणी करण्यात आली होती. पैकी ३५ हजार ६९८ मेगावॅट वीजपुरवठा करण्यात आला आहे. पूर्व क्षेत्रातील राज्यांकडून १६ हजार ९०९ मेगावॅट विजेची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यांना १६ हजार ६०९ मेगावॅट वीजपुरवठा करण्यात आला आहे. उत्तर पूर्व क्षेत्रातील राज्यांकडून २ हजार ५२८ मेगावॅट विजेची मागणी करण्यात आली होती. पैकी २ हजार १४१ मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात आला आहे. संपूर्ण देशाचा विचार विजेच्या पुरवठ्यात करता - ४.७ टक्के घट झालेली दिसून येत आहे.


विजेचे स्रोत
विजेच्या पुरवठ्यात - ४.७ टक्क्यांनी घट.
पूर्व क्षेत्रातील राज्यांकडून १६ हजार ९०९ मेगावॅट विजेची मागणी.


स्रोतवीज निर्मिती
कोळसा१,५३,५७१
गॅस२२,९७१
डिझेल१,२००
अणुऊर्जा ४,७८०
जलविद्युत४०,७९९
अन्य७२,४९१

Web Title: 2.5 million MW electricity in the seventy years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.