उजळाईवाडीत २५ तोळे सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:43 AM2021-02-06T04:43:34+5:302021-02-06T04:43:34+5:30

उचगाव : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील कोर्ट कॉलनीतील स्नेहल सदाशिव बेडक्याळे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी २५ ...

25 ounces of gold lamps in Ujlaiwadi | उजळाईवाडीत २५ तोळे सोने लंपास

उजळाईवाडीत २५ तोळे सोने लंपास

Next

उचगाव : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील कोर्ट कॉलनीतील स्नेहल सदाशिव बेडक्याळे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी २५ तोळे सोने लंपास केले. त्याचप्रमाणे सुर्वे नावाच्या व्यक्तीच्या बंगल्यातही चोरी झाली आहे. उजळाईवाडीत कोर्ट कॉलनीत सायंकाळी साडेपाच ते सातच्या दरम्यान स्नेहल सदाशिव बेडक्याळे यांच्या बंगल्यात कोणी नसल्याचे पाहून दाराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील २५ तोळे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी चोरट्यांनी लंपास केली.

स्नेहल बेडक्याळे या आपल्या दहावीत शिकणाऱ्या मुलास साडेचारच्या दरम्यान राजारामपुरी येथे क्लासला सोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचे पती सदाशिव बेडक्याळे हे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून मिरजेला कामाला आहेत.

दरम्यान, घरातील बेडमधील व कपाटातील मंगलसूत्र, हार, सोन्याच्या बांगड्या, चेन, अंगठी, कानातील फुले, मोत्याचे पेंडंट, लॉकेट व चांदीची भांडी, उशीच्या कव्हरमध्ये घालून चोरट्यांनी पळवले. दरम्यान, ठसे तज्ज्ञ, डॉग स्कॉटलाही पाचारण करण्यात आले आहे. परिसरात गुरुवारी सायंकाळी दोन चोऱ्या झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे, यासह पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. घटनास्थळी करवीर उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रशांत अमृतकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

चौकट :

इतर वेळी बाहेर जाताना कुत्र्याची साखळी सोडून दिली जाते; पण यावेळी बेडक्याळे यांच्या मूलाने कुत्र्याला बाहेर जाताना साखळी लावली होती. त्यामुळे चोरटयांचे फावल्याची चर्चा सुरू होती. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

फोटो ओळ: कोर्ट कॉलनी उजळाईवाडी येथे धाडसी चोरी झाली.

Web Title: 25 ounces of gold lamps in Ujlaiwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.