महापालिका शाळांतील २५ विद्यार्थी चमकले
By admin | Published: April 7, 2017 01:01 AM2017-04-07T01:01:49+5:302017-04-07T01:01:49+5:30
टेंबलाईवाडी विद्यामंदिरचे विद्यार्थी दोन्ही गटांत पहिले : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
कोल्हापूर : महानगरपालिका स्तरावर घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षेत
२५ विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. टेंबलाईवाडी
विद्यामंदिर शाळेतील वर्धन धनाजी माळी यांनी ३०० पैकी ३०० गुण मिळवून गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक तर प्रथमेश मलकारी आरगे याने २९८ गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. मुलींमध्ये याच शाळेची विद्यार्थिनी श्वेता सदानंद बाळेकुंद्री हिने २९४ गुणांसह पहिला, तर
गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक मिळविला.
महानगरपालिका शिक्षण समितीने गुरुवारी जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीत टेंबलाईवाडी विद्यामंदिर (६), लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर (१५), नेहरुनगर विद्यामंदिर (२), जोतिर्लिंग विद्यामंदिर (१), यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर (१) या शाळांतील विद्यार्थ्यांनी वर्चस्व राखले आहे. शासनाच्या नवीन बदललेल्या धोरणानुसार चौथी ऐवजी पाचवीच्या स्तरावर ही शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेबु्रवारी २०१७ ला घेतली होती. गुणवत्ता यादीत स्थान पटकाविणाऱ्या २५ विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्या शाळेत सातवी किंवा आठवीपर्यंत शिक्षण घेतील तोपर्यंत प्रत्येक वर्षी २४०० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तसेच ट्रॉफी व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय उर्वरित ४९ पात्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मेडल व
प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.
शिष्यवृत्ती परीक्षा व निकालाचे कामकाज प्रशासनाधिकारी प्रतिभा सुर्वे, सहायक कार्यक्रम अधिकारी रसूल पटेल, प्रभारी लेखापाल राजीव साळोखे, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, उषा सरदेसाई, बाबासाहेब कांबळे, संजय शिंदे यांनी पाहिले. (प्रतिनिधी)
गुणवत्ता विद्यार्थ्याचे नावशाळेचे नाव
क्रमांक
१वर्धन धनाजी माळीटेंबलाईवाडी विद्यामंदिर
२प्रथमेश मलकारी आरगेटेंबलाईवाडी विद्यामंदिर
३श्वेता सदानंद बाळेकुंद्रीटेंबलाईवाडी विद्यामंदिर
३अर्शद मुबारक नाकाडेलक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर
३प्रथमेश राजीव जरगलक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर
४संचिता सचिन पाटीलनेहरुनगर विद्यामंदिर
४आर्य राजाराम तळपलक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर
५केतन कृष्णात संकपाळटेंबलाईवाडी विद्यामंदिर
५समृद्धी मनोज कुलकर्णी लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर
गुणवत्ता विद्यार्थ्याचे नावशाळेचे नाव
क्रमांक
५पार्थ कृष्णात पाटीललक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर
५नरेंद्र संजय दाभोळकरनेहरुनगर विद्यामंदिर
६अपसिन सिकंदर शेखलक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर
७वैष्णवी प्रकाश पाटीललक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर
७हृषिकेश किरण पोतदारलक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर
८प्रथमेश राहुल साळुंखेलक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर
९शिवराज शशिकांत जाधवटेंबलाईवाडी विद्यामंदिर
९आदिती उमेश पोवारटेंबलाईवाडी विद्यामंदिर
गुणवत्ता विद्यार्थ्याचे नावशाळेचे नाव
क्रमांक
९श्रावण सागर जाधवलक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर
१०सायली दत्तात्रय पाटीललक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर
१०सारिका शिवाजी पाटीललक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर
११आर्यन नितीन थडकेलक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर
११हर्ष पुंडलिक खानापूरकरजोतिर्लिंग विद्यामंदिर
१२सुहानी मोहन देसाई लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर
१२वैभवी राजू सुतार यशवंतराव विद्यामंदिर
१२धनराज मकरंद माने लक्ष्मीबाई विद्यामंदिर