सरकारी बाबूंची अडीच हजार पदे रिक्त

By admin | Published: March 14, 2016 12:29 AM2016-03-14T00:29:14+5:302016-03-14T00:29:31+5:30

विभागीय आयुक्तांना अहवाल : सार्वजनिक बांधकामसह पाटबंधारेवर जादा भार

2,500 vacancies of government officials vacant | सरकारी बाबूंची अडीच हजार पदे रिक्त

सरकारी बाबूंची अडीच हजार पदे रिक्त

Next

प्रवीण देसाई -- कोल्हापूर --जिल्ह्यातील ३६ शासकीय कार्यालयांमध्ये एकूण २६८५ पदे रिक्त असल्याचे चित्र पुढे आले आहे. १३ हजार ५६ मंजूर पदांपैकी १० हजार ३७१ लोकच कार्यरत आहेत. एस. टी. महामंडळासह सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे कार्यालय, विक्रीकर कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक या कार्यालयांमध्ये सर्वाधिक पदे रिक्त आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाचा कारभार २२५ जण हाकत आहेत. रिक्त पदांचा ताण कार्यरत कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने उर्वरित पदे केव्हा भरली जाणार? अशी विचारणा होत आहे.
राज्य शासनाकडून जिल्ह्यातील विविध कार्यालयांमधील पदांची माहिती मागविण्यात आली. त्यानुसार नुकताच जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे. वर्ग एक ते चतुर्थ श्रेणीपर्यंतच्या मंजूर व कार्यरत पदांची ही संख्या आहे. पदे रिक्त राहिल्यामुळे कामाचा ताण उपलब्ध मनुष्यबळावर पडतो व त्याचा परिणाम म्हणून त्या कार्यालयांत जाणाऱ्या लोकांना हेलपाटे मारायची वेळ येते. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीच ही पदे तातडीने कशी भरली जातील, याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. जिल्ह्याातील ३६ शासकीय कार्यालयांमध्ये विविध वर्गांच्या एकूण १३ हजार ५६ मंजूर पदांपैकी १० हजार ३७१ पदे कार्यरत असून, त्यांपैकी २६८५ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये एस. टी. महामंडळाकडे ८५५ पदे रिक्त आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग येथे ५५१, पाटबंधारे कार्यालय येथे ३८९, विक्रीकर कार्यालयात २६८, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय येथे ७६, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथे प्रत्येकी ७० पदे रिक्त आहेत. जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे एकही पद रिक्त नसल्याचे दिसत आहे. सर्वांत कमी पदे रिक्त असणारे कार्यालय म्हणून जिल्हा सैनिक कार्यालयाकडे पाहावे लागेल; कारण येथे एकच पद रिक्त आहे.


कार्यालयाचे नावमंजूर पदेकार्यरत पदेरिक्त पदे
एस. टी. महामंडळ६१७६५३२१८५५
सार्वजनिक बांधकाम विभाग८६८३१७५५१
पाटबंधारे विभाग१२०७८१८३८९
विक्रीकर कार्यालय५२२२५४२६८
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय७१२६३६७६
जिल्हाधिकारी कार्यालय२९५२२५७०
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)१६२९२७०
जिल्हा परिषद ५४१४८३५८
पोलीस अधीक्षक कार्यालय१८६१६७१९
जिल्हा सांख्यिकी कार्यालय १७१४०३
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय१४१३०१
राज्य उत्पादन शुल्क कार्यालय१८५१४६३९
सहायक जिल्हा निबंधक (मुद्रांक) ८९६६२३
कार्यालय
जिल्हा कोषागार कार्यालय१३०१२६०४
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)१६८१३७३१
उपसंचालक, नगररचना कार्यालय२३१८०५
सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन२४१६०८
अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय१३११०२
कार्यालयाचे नावमंजूर पदेकार्यरत पदेरिक्त पदे
सहायक संचालक, जिल्हा रोजगार २४१११३
व स्वयंरोजगार
विशेष समाजकल्याण अधिकारी२२२००२
जिल्हा उद्योग केंद्र २५१५१०
जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी४५२१२४
जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी२११७०४
सहायक कामगार आयुक्त कार्यालय३३१६१७
जिल्हा मस्त्य व्यवसाय अधीक्षक१४११०३
जिल्हा दुग्धविकास अधिकारी१३०९०४
जिल्हा महिती अधिकारी१८१३०५
उपवनसंरक्षक, वनविभाग२८६२६८१८
जिल्हा व सत्र न्यायालय७८७७८७००
जिल्हा विशेष लेखापरीक्षक ९४६४३०
जिल्हा कृषी अधिकारी३७ २९०८
अधीक्षक, जिल्हा होमगार्ड१६ ०७०९
जिल्हा सैनिक कार्यालय१८१७०१
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ०८०८००
औद्योगिक प्रशिक्षण संस्था २१८१६०५८
जिल्हा तुरुंग अधिकारी कार्यालय, बिंदू चौक ४५ ३८०७

Web Title: 2,500 vacancies of government officials vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.