कोरोनासंबंधीचे नियम तोडणाऱ्या २५१ नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:22 AM2021-05-15T04:22:29+5:302021-05-15T04:22:29+5:30

कोल्हापूर : शहरात विनामास्क, सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या २५१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख ३० ...

251 citizens fined for violating corona rules | कोरोनासंबंधीचे नियम तोडणाऱ्या २५१ नागरिकांना दंड

कोरोनासंबंधीचे नियम तोडणाऱ्या २५१ नागरिकांना दंड

Next

कोल्हापूर : शहरात विनामास्क, सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या २५१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर सकाळी अकरानंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्या तीन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गुरुवारी दिवसभरात ही कारवाई करण्यात आली.

महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस यांची पाच पथके स्थापन करण्यात आली असून, नियम तोडणाऱ्यांविरुध्द ही कारवाई केली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे व सकाळी ११ नंतर दुकाने बंद ठेवणे या गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. शहरात गुरुवारी विनामास्क २४२ लोकांकडून एक लाख २१ हजार, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने नऊ नागरिकांकडून नऊ हजार व सकाळी ११ नंतर दुकाने चालू ठेवलेल्या तीन दुकानदारांकडून १२ हजार असे एकूण एक लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

ही कारवाई शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, गंगावेश, रंकाळावेश, लक्ष्मीपुरी, उतरेश्वर, लक्षतिर्थ वसाहत, महाद्वार रोड, शिवाजी पेठ, फुलेवाडी, नाना पाटीलनगर, जरगनगर, रायगड कॉलनी, साने गुरुजी वसाहत, साळोखेनगर, संभाजीनगर, खासबाग, जवाहरनगर, उद्यमनगर, प्रतिभानगर, शाहूनगर, राजारामपुरी परिसर, शाहूपुरी परिसर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, राजेन्द्रनगर, सायबर चौक, मार्कट यार्ड, रुईकर कॉलनी, कदमवाडी, सदर बाजार, कसबा बावडा, लाईन बाजार, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, एसटी स्टॅण्ड परिसर, रेल्वे स्टेशन या परिसर करण्यात आली.

Web Title: 251 citizens fined for violating corona rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.