जिल्ह्यात पहिल्याच दिवशी २६ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 07:01 PM2020-12-23T19:01:40+5:302020-12-23T19:04:18+5:30
gram panchayat Election kolhapur - कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून २६ अर्ज महसूल विभागाकडे आले. सर्वाधिक १० अर्ज हातकणंगले तालुक्यांतून आले आहेत. शुक्रवारपासून सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने सोमवार, मंगळवार व बुधवार हे तीन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून २६ अर्ज महसूल विभागाकडे आले. सर्वाधिक १० अर्ज हातकणंगले तालुक्यांतून आले आहेत. शुक्रवारपासून सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने सोमवार, मंगळवार व बुधवार हे तीन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे.
तालुक्याच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज स्वीकारले जात असून पहिल्या दिवशी २६ अर्ज आले. अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची चौकशी करण्यासाठी तहसीलदार कार्यालय, तसेच अर्ज भरण्याच्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची व समर्थकांची गर्दी झाली होती.
अनेकांची कागदपत्रांची अद्याप पूर्तता न झाल्याने व काही प्रभागांमध्ये उमेदवारीचे त्रांगडे असल्यानेही पहिल्या दिवशी अर्ज सादर करता आले नाहीत. आज मार्गशीर्ष गुरुवारचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी ख्रिसमस, त्यानंतर शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्या आल्याने सोमवारपासून पुढे तीन दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार आहे.
आलेले उमेदवारी अर्ज
तालुका ग्रामपंचायतींची संख्या आलेले अर्ज
शाहूवाडी : ४१ : ०
पन्हाळा : ४२ : ३
हातकणंगले : २१ : १०
शिरोळ : ३३ : १
करवीर ५४ : १
गगनबावडा : ८ : ०
राधानगरी : १९ : ०
कागल : ५३ : १
भुदरगड : ४५ : २
आजरा : २६ : ४
गडहिंग्लज : ५० : ४
चंदगड : ४१ : ०
एकूण ४३३ : २६