शिरोळमध्ये २६ मिलिमीटर पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:26 AM2021-05-25T04:26:07+5:302021-05-25T04:26:07+5:30
शिरोळ : पावसाने रविवारी रात्री शिरोळ तालुक्याला झोडपून काढले. २५.७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मान्सूनपूर्व संततधार पावसामुळे सखल भागाबरोबर ...
शिरोळ : पावसाने रविवारी रात्री शिरोळ तालुक्याला झोडपून काढले. २५.७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मान्सूनपूर्व संततधार पावसामुळे सखल भागाबरोबर शेतामध्ये पाणी साचून राहिले होते. ऊस पिकाला हा पाऊस पोषक ठरला असला तरी मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली.
खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांकडून सुरू आहे. त्यातच मान्सूनपूर्व पावसानेदेखील हजेरी लावली. रविवारी सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे उष्म्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. शिरोळ मंडल अंतर्गत ४५, नृसिंहवाडी १७, नांदणी २८, जयसिंगपूर ३३, शिरढोण ३०, कुरुंदवाड १४, दत्तवाड १३ असा एकूण १८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली तरी सरासरी तालुक्यात २५.७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
फोटो - २४०५२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरोळ येथील ऊस पिकामध्ये अशा प्रकारे पावसाचे पाणी साचले आहे. (छाया : सुभाष गुरव, शिरोळ)