नव्या उद्योगात २६१ कोटींची गुंतवणूक ४ हजार ९२७ रोजगार निर्मिती - पालकमंत्री सतेज पाटील : प्रजासत्ताक दिनी घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:16 AM2021-02-05T07:16:10+5:302021-02-05T07:16:10+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात नव्या उद्योगांमध्ये २६१.६ कोटींची गुंतवणूक झाल्याने ४ हजार ९२७ रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज ...

261 crore investment in new industry 4 thousand 927 job creation - Guardian Minister Satej Patil: Republic Day announcement | नव्या उद्योगात २६१ कोटींची गुंतवणूक ४ हजार ९२७ रोजगार निर्मिती - पालकमंत्री सतेज पाटील : प्रजासत्ताक दिनी घोषणा

नव्या उद्योगात २६१ कोटींची गुंतवणूक ४ हजार ९२७ रोजगार निर्मिती - पालकमंत्री सतेज पाटील : प्रजासत्ताक दिनी घोषणा

Next

कोल्हापूर : जिल्ह्यात नव्या उद्योगांमध्ये २६१.६ कोटींची गुंतवणूक झाल्याने ४ हजार ९२७ रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी केले. जिल्ह्याचे कोरोना रिकव्हरी प्रमाण ९६.४ टक्के असून, जिल्हा राज्यात अव्वल असल्याचे सांगून त्यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शिवाजी स्टेडिअमवर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी शाहू छत्रपती, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, जिल्ह्याचा औद्योगिक विकास व तरूणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी नवीन औद्योगिक वसाहती निर्माण करण्यात येणार आहेत. यासाठी जागेचे संपादन करून या वसाहती विकसित करण्याचा मानस आहे. जिल्ह्यात सध्या ६ एमआयडीसी आणि १ आयटी पार्क कार्यरत आहे. गतवर्षीच्या आकडेवारीनुसार ३ हजार ६४० उद्योग घटक असून, नव्याने ३५ उद्योगांची भर पडली आहे. या नव्या उद्योगांमध्ये २६१.६ कोटींची गुंतवणूक असून, यामुळे ४ हजार ९२७ रोजगार निर्मिती होणार आहे.

जिल्ह्याचे कोरोना रिकव्हरी प्रमाण ९६.४ टक्के असून, जिल्हा राज्यात अव्वल आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ५९८ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यात १५ हजार ५०० रेमिडेसीवीर इंजेक्शनचे मोफत वाटप करणारा राज्यात कोल्हापूर हा एकमेव जिल्हा आहे. लसीची निर्मिती केेलेल्या हैदराबादची भारत बायोटेक आणि सिरम या संस्थांचे तसेच कोरोना काळात सेवा दिलेल्या संस्था व प्रसारमाध्यमांचेही त्यांनी यावेळी आभार मानले.

यावेळी शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या वीरमाता कविता जोंधळे आणि शहीद संग्राम पाटील यांच्या वीरपत्नी हेमलता पाटील यांना ताम्रपट वितरण करण्यात आले. तसेच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह २४ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. अनिता सैब्बनावर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. शेटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम मदने, डॉ. रश्मी राऊत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

---

यांचाही सन्मान

यावेळी अग्निशामक विभागातील अमोल पाटील, फायरमन श्रीधर चाचे आणि गिरीष गवळी यांचा तसेच महसूल जत्रेत उल्लेखनीय काम केल्याबद्दल मंडल अधिकारी भाऊसाहेब खोत व गणपती पाटील, तलाठी नसीम मुलाणी, साताप्पा पाटील, तानाजी जाधव, शिवराज देसाई, तांत्रिक सहायक अशोक कोरे व सतीश दाबाडे, खेळाडू अमित शिंत्रे, शाहू माने, अभिज्ञा पाटील, रसिका शिरगावे, ज्योती सुतार, हर्षवर्धन भोसले, अभिषेक जाधव, डॉ. वेदिका वालेकर, दुर्वांक गावडे, दिव्या संकपाळ आणि प्राजक्ता सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला. हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची योजनेतील जिल्हास्तरीय विजेत्या महिला बचत गटांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

---

फोटो फाईल स्वतंत्र

Web Title: 261 crore investment in new industry 4 thousand 927 job creation - Guardian Minister Satej Patil: Republic Day announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.