बिद्री ग्रामपंचायत ११ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:17 AM2021-01-10T04:17:41+5:302021-01-10T04:17:41+5:30
सरवडे : बिद्री ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे- बाबासाहेब पाटील विरोधात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ -शिवसेना खासदार ...
सरवडे : बिद्री ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे- बाबासाहेब पाटील विरोधात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ -शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या पॅनेलमध्ये सरळ लढत होत आहे. याशिवाय चार अपक्षांसह २७ उमेदवार या निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. बिद्री गावात मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, बिद्री साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब पाटील, ‘शाहू’चे अध्यक्ष समरजित घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे प्रमुख राजकीय गट आहेत.
सन २०१५ मध्ये झालेल्या गत ग्रामपंचायत निवडणुकीत ‘बिद्री’चे संचालक बाबासाहेब पाटील गटाचे प्रमुख पांडुरंग संतराम पाटील यांच्या पॅनेलने बहुमत मिळविले होते. त्यावेळी मंडलिक व संजय घाटगे गटाची साथ होती. या निवडणुकीसाठी ‘बिद्री’चे संचालक बाबासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पांडुरंग संतराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली महालक्ष्मी पॅनेल तयार केले आहे. त्यांच्याविरोधात इतर गटांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्वतंत्र ‘संत बाळूमामा विकास आघाडी’ केली आहे. आहे. याशिवाय प्रभाग एकमध्ये तीन आणि प्रभाग दोनमध्ये एक अपक्ष असे चार अपक्ष या निवडणुकीत उतरले आहेत. येथे मुश्रीफ गटाचे स्वतंत्र भावेश्वरी विकास आघाडीने उमेदवार उभे केले आहेत; तर या प्रभागात स्थानिक बिद्री गावचे मतदार कमी; पण तीन राज्यांतून व्यवसायाने स्थायिक झालेले मतदार सर्वाधिक आहेत.
..............
चौकट
सख्ख्या बहिणी एकाच वॉर्ड, एकाच पँनेलमधून रिंगणात
ग्रामपंचायतीच्या वॉर्ड तीनमधून दोन सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. यासाठी महाविकास आघाडीतून मुश्रीफ-मंडलिक पॅनेलमधून रूपाली इंद्रजित पाटील व उज्ज्वला अजित पाटील या दोन सख्ख्या बहिणी एकाच वॉर्डातून, एकाच पॅनेलमधून रिंगणात उतरल्या आहेत. रूपाली या ज्येष्ठ नेते डी. डी. पाटील यांच्या; तर उज्ज्वला या पांडुरंग हरी पाटील यांच्या स्नुषा आहेत. दोघींचे माहेर पाडळी खुर्द (ता. करवीर)आहे.
.......
ठळक मद्दे ............ प्रभाग संख्या : ४
सदस्य संख्या : ११
उमेदवार : २७
एकूण मतदार : २९१२
पुरुष मतदार : १४६३
स्त्री मतदार : १४४९.