जिल्ह्यातील 27 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून 1058 क्युसेक विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 08:00 PM2020-06-18T20:00:47+5:302020-06-18T20:04:12+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 67.03 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 850 व सिंचन विमोचकातून 1058 असा एकूण 1908 क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून 2111 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण 27 बंधारे पाण्याखाली आहेत.
कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 67.03 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 850 व सिंचन विमोचकातून 1058 असा एकूण 1908 क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून 2111 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण 27 बंधारे पाण्याखाली आहेत.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे. कासारी नदीवरील- यवलूज. तुळशी नदीवरील- बीड. वेदगंगा नदीवरील-वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली. वारणा नदीवरील माणगाव व चिंचोली. दुधगंगा नदीवरील सिध्दनेर्ली, बाचणी, सुळंबी, तुरंबे, कसबा वाळवे, सुळकुड व दत्तवाड असे एकूण 27 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 33.27 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 36.35 इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा
तुळशी 44.40 दलघमी, वारणा 355.92 दलघमी, दूधगंगा 244.45 दलघमी, कासारी 29.27 दलघमी, कडवी 29.03 दलघमी, कुंभी 31.44 दलघमी, पाटगाव 33.34 दलघमी, चिकोत्रा 15.87 दलघमी, चित्री 12.92 दलघमी, जंगमहट्टी 7.27 दलघमी, घटप्रभा 34.04 दलघमी, जांबरे 5.64 दलघमी, कोदे (ल पा) 2.89 दलघमी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे
राजाराम 25.1 फूट, सुर्वे 24.6 फूट, रुई 54 फूट, इचलकरंजी 51 फूट, तेरवाड 46.6 फूट, शिरोळ 35.9 फूट, नृसिंहवाडी 30 फूट, राजापूर 19.6 फूट तर नजीकच्या सांगली 6.6 फूट व अंकली 10.2 फूट अशी आहे.
गगनबावड्यात काल 86.50 मिमी पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 86.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 11.63 एकूण 91.88 मिमी, शिरोळ- 12 एकूण 64 मिमी, पन्हाळा- 40.14 एकूण 303.29 मिमी, शाहुवाडी- 60.70 मिमी एकूण 382.50 मिमी, राधानगरी- 41.17 मिमी एकूण 399 मिमी, गगनबावडा-86.50 मिमी एकूण 907 मिमी, करवीर- 25.36 एकूण 280.18 मिमी, कागल- 41 एकूण 307.29 मिमी, गडहिंग्लज- 30 एकूण 185.43 मिमी, भुदरगड- 52.80 एकूण 332.20 मिमी, आजरा- 54.75 मिमी एकूण 371 मिमी, चंदगड- 59 मिमी एकूण 410.67 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.