जिल्ह्यातील 27 बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 06:35 PM2021-08-05T18:35:12+5:302021-08-05T18:45:06+5:30

Rain Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 234.49 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

27 dams under water in the district | जिल्ह्यातील 27 बंधारे पाण्याखाली

जिल्ह्यातील 27 बंधारे पाण्याखाली

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील 27 बंधारे पाण्याखालीराधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 234.49 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे. वारणा नदी- चिंचोली, माणगांव व खोची. कासारी नदी- यवलूज, पुनाळ-तिरपन व ठाणे-आळवे. दुधगंगा नदी- दत्तवाड व सिद्धनेर्ली. वेदगंगा नदी- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली. कुंभी नदी- कळे असे एकूण 27 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये तुळशी -89.23 दलघमी, वारणा -875.86, दूधगंगा झ्र 617.02, कासारी- 62.61, कडवी -71.24, कुंभी-63.01, पाटगाव 97.87, चिकोत्रा- 40.47, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी -34.65, घटप्रभा - 44.17, जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -
राजाराम 29.9 फूट, सुर्वे 28.4, रुई 56.9, इचलकरंजी 54.4, तेरवाड 46.6, शिरोळ 39.1 तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची 40 फूट इतकी पाणी पातळी सध्या आहे.

Web Title: 27 dams under water in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.