...२७ वर्षे गावाला फलकावरुन माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:56 PM2019-01-20T23:56:11+5:302019-01-20T23:56:15+5:30

बाजीराव जठार । लोकमत न्यूज नेटवर्क वाघापूर : समाजात घडणाऱ्या विविध घटना तसेच सामाजिक, शासकीय आदेश लोकांना तत्पर समजण्यासाठी ...

... 27 years old information from the village | ...२७ वर्षे गावाला फलकावरुन माहिती

...२७ वर्षे गावाला फलकावरुन माहिती

googlenewsNext

बाजीराव जठार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाघापूर : समाजात घडणाऱ्या विविध घटना तसेच सामाजिक, शासकीय आदेश लोकांना तत्पर समजण्यासाठी गेली २७ वर्षे फलकलेखन करणारे वाघापूर (ता. भुदरगड) येथील ‘अक्षरयात्री’ नामदेव संभाजी कुंभार यांनी हा छंद जोपासला आहे आणि तोही अगदी विनामूल्य.
खरोखरच आज धावपळीच्या युगामध्ये सर्वच माणसांना सर्व गोष्टी ज्ञात होणे तसे अवघड असते; परंतु गावातील व परिसरातील विविध चांगल्या, लहानसहान घटना माहीत नसतात. परंतु, या सर्व घटना लोकांना फलक लेखनामुळे समजून येतात. कुंभार या सर्व बातम्यांचे लेखन येथील जागृत देवस्थान ज्योतिर्लिंग मंदिराच्या वार्ताफलकावर सुंदर हस्ताक्षरात लिहितात. त्यांच्या
या उपक्रमाचे गावातून कौतुक होत आहे.
नामदेव कुंभार हे दररोज गावात येणाºया सर्वच दैनिकांमधून महत्त्वाच्या बातम्या तसेच त्याव्यतिरिक्त परिसरात घडणाºया घटनांची माहिती ते वार्ताफलकावर लिहितात. त्यांनी शासकीय आदेश, परिपत्रक, बातम्या, पल्स पोलिओ, लेक वाचवा अभियान, कुपोषित बालक, सण, उत्सव, विविध स्पर्धा, अभिनंदनीय निवड,
समाज विघातक घटनेचा निषेध, सामाजिक एकता टिकविणाºया बातम्या, वाढदिवस, निधन, अभिनंदन यांसारख्या अनेक बातम्यांपैकी समाज उपयोगी एकतरी बातमी दररोज लिहिणे गेली अखंडित २७ वर्षे सुरू आहे.
त्यांनी यापूवीर्ही प्रकाश जठार - नाईक यांना घेऊन वाघापूर येथे ‘कलाजीवन सुंदर हस्ताक्षर’ वर्ग विद्यार्थ्यांसाठी मोफत चालू केले होते. यापूर्वी त्यांनी एका पोस्टकार्डावर साध्या पेन्सिलीने १ लाख २६ हजार वेळा ‘राम’ असे लिहिले आहे. तसेच तिळावर, तांदळावर, खसखसीवर शिवाजी, ज्ञानेश्वर, तर
तांदळावर अष्टविनायक अशी चित्रे रेखाटली आहेत. त्यांनी सीमाभागातील अनेक महाविद्यालयांत हस्ताक्षराविषयी मोफत मार्गदर्शन
केले आहे. त्यांच्या या कार्याची
दखल घेऊन विविध संस्थांकडून त्यांना नऊ पुरस्कार मिळाले
आहेत.

Web Title: ... 27 years old information from the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.