जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 18:45 IST2021-08-02T18:43:03+5:302021-08-02T18:45:29+5:30
Flood Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.18 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग
ठळक मुद्देजिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग
कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.18 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे. तुळशी नदी- बीड.
वारणा नदी- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, तांदुळवाडी, चावरे, खोची, दानोळी व मांगलेसावर्डे. कासारी नदी- यवलूज, पुनाळ-तिरपन व ठाणे-आळवे. दुधगंगा नदी- दत्तवाड, बाचणी, सुळकुड व सिद्धनेर्ली असे एकूण 28 बंधारे पाण्याखाली आहेत.
- जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा
तुळशी -85.42 दलघमी, वारणा -841.70, दूधगंगा झ्र 592.03, कासारी- 58.08, कडवी झ्र 71.24, कुंभी-61.09, पाटगाव- 96.12, चिकोत्रा- 39.34, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी -34.65, घटप्रभा - 44.17, जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
- बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 28.7 फूट, सुर्वे 30.4, रुई 63.4, इचलकरंजी 62, तेरवाड 60.8, शिरोळ 59.6 तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची 59.5 फूट इतकी पाणी पातळी सध्या आहे.