‘किसन वीर’ कारखान्याच्या रणांगणात २८ जण
By admin | Published: April 22, 2015 09:39 PM2015-04-22T21:39:32+5:302015-04-23T00:55:56+5:30
भुर्इंज : पाचजणांची बिनविरोध निवड; राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीपासून दूरच
वाई : किसन वीर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेलचे २१ पैकी पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. इतर १६ जागांसाठी २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस पुरस्कृत सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेल व भाजप, शिवसेना, अपक्ष यामध्ये लढत होत आहे. सहा जागांसाठी भाजप-शिवसेनेला उमेदवार मिळाले नाहीत. राष्ट्रवादीने कारखान्यावर कर्ज खूप असल्याने ही निवडणूक न लढविण्याचा या पूर्वीच निर्णय घेतला आहे.
ऊस उत्पादक गट क्र. ४ सातारा येथील तीन जागांसाठी सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेलचे मधुकर दिनकर नलवडे (वाढे, ता. सातारा), प्रकाश नारायण पवार (आरफळ, ता. सातारा) व चंद्रकांत बजरंग इंगवले (किडगाव, ता. सातारा) यांचे तीनच अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. सोसायटी मतदारसंघात एका जागेसाठी शेतकरी विकास पॅनेलचे नवनाथ निवृत्ती केंजळे (कठापूर, ता. कोरेगाव) यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.सत्तारुढ पॅनेलला एकूण पाच जागा बिनविरोध मिळाल्या आहेत.
ऊस उत्पादक गट क्र. १ कवठे-खंडाळा येथील तीन जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेलचे राहुल भगवानराव घाडगे (लोणंद), प्रवीण विनायक जगताप (केंजळ), प्रताप ज्ञानेश्वर यादव (गुळुंब) यांच्याविरोधात भाजप-शिवसेनेचे उमेदवार उदय परसराम यादव (पारगाव) व निवृत्ती वामन देशमुख (शिरवळ).
ऊस उत्पादक गट क्र. २ भुर्इंज येथे दुरंगी लढत होत आहे. सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेलचे विद्यमान अध्यक्ष मदन प्रतापराव भोसले (भुर्इंज) विद्यमान उपाध्यक्ष गजानन धरमसी बाबर (किकली), मधुकर रामचंद्र शिंदे (जांब) यांच्याविरोधात शिवसेनेचे उमेदवार गणपत पांडुरंग शिंगटे (खडकी), अपक्ष उमेदवार विद्यमान संचालक नारायणराव कृष्णाजी पवार (किकली), अविनाश राजाराम जाधव (भुर्इंज).
ऊस उत्पादक गट क्र. ३ - वाई, बावधन, जावळी येथे दुरंगी लढत होत आहे. सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेलचे विद्यमान संचालक रतनसिंह सर्जेराव शिंदे (वाई), सयाजी विनायक पिसाळ (बावधन), चंद्रसेन सुरेशराव शिंदे (कुडाळ), यांच्याविरोधात शिवसेनेचे उमेदवार नंदकुमार आनंदराव नायकवडी (शहाबाग), अमृतराव विठ्ठल शिंदे (कुडाळ), वाई शहर शिवसेना प्रमुख किरण मधुकर खामकर.
ऊस उत्पादक गट क्र. ५ - कोरेगाव येथील तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असून, सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेलचे विद्यमान संचालक सचिन घनशाम साळुंखे (अंबवडे -संमत), नंदकुमार ज्ञानदेव निकम (सांगवी), विजय आनंद चव्हाण (दहिगाव), यांच्याविरोधात शिवसेनेचे उमेदवार बाळू नथू फाळके (सातारारोड).
भटक्या विमुक्त जाती जमातीत सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेलचे विद्यमान संचालक चंद्रकांत वामन काळे (वाई) व शिवसेनेचे लक्ष्मण रामचंद्र खरात (वाई).
महिला राखीव गटातील दोन जागांसाठी तीन अर्ज राहिले असून, सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेलच्या विजया जयवंत साबळे (शिवथर, ता. सातारा), आशा दत्तात्राय फाळके (सातारारोड, ता. कोरेगाव), यांच्याविरोधात भाजपच्या विजया वसंत भोसले (बावधन). इतर मागास प्रवर्गामध्ये सत्तारुढ विकास पॅनेलचे अरविंद शंकर कोरडे (शहाबाग, ता. वाई) व शिवसेनेचे तालुका प्रमुख नंदकुमार आनंदराव नायकवडी यांच्यात लढत होणार आहे. (प्रतिनिधी)