या २८ हजार लोकाचे होणार कसे? ते आपल्या घरी सुरक्षित जाणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 12:37 PM2020-05-04T12:37:17+5:302020-05-04T12:41:16+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी १३ हजार ७३० जणांनी, तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या १५ हजार ५१ जणांनी प्रशासनाने तयार केलेल्या ...

28 thousand | या २८ हजार लोकाचे होणार कसे? ते आपल्या घरी सुरक्षित जाणार!

या २८ हजार लोकाचे होणार कसे? ते आपल्या घरी सुरक्षित जाणार!

Next
ठळक मुद्देबाहेर येण्या-जाण्यासाठी २८ हजार जणांची नोंदणी

कोल्हापूर : जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी १३ हजार ७३० जणांनी, तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या १५ हजार ५१ जणांनी प्रशासनाने तयार केलेल्या https://bit.ly/Kopentryexit  या लिंकवर आपली माहिती भरली. रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत एकूण २८ हजार ७८१ जणांनी नोंदणी केल्याची माहिती, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरू, प्रवासी आणि इतर नागरिक अडकले आहेत. अशा व्यक्तींना आपापल्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यांमध्ये जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे.

या धोरणानुसार कोल्हापूर जिल्ह्यामधून बाहेर जाणाऱ्या तसेच बाहेरच्या जिल्ह्यांमधून कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ttps://bit.ly/Kopentryexit  ही लिंक तयार केली आहे. यावर माहिती भरण्याचे आवाहन शनिवारी केले होते. रात्री आठ वाजेपर्यंत यावर जिल्ह्यात प्रवेशासाठी १३ हजार ७३० जणांनी, जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी १५ हजार ५१ जणांनी नोंदणी केली, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

 

 

Web Title: 28 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.