२८४ किलो चांदी निपाणीजवळ जप्त
By admin | Published: November 7, 2015 12:34 AM2015-11-07T00:34:32+5:302015-11-07T00:42:39+5:30
तिघांना अटक : कर्नाटक पोलिसांची कारवाई
निपाणी : सेलम (तमिळनाडू) येथून हुपरीकडे बेकायदा चांदी घेऊन जाणाऱ्या तिघांना निपाणी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १ कोटी ३६ लाख रुपयांची २८४.४ किलो चांदी जप्त करण्यात आली. कारचालक व्यंकटेश पांडुरंग (वय २८, रा. सेलम), मच्छिंद्र नामदेव पवार (३७, रा. वडगाव हवेली, कऱ्हाड), राजाराम गोविंदराव पाटील (२९, रा. तासगाव शिरगाव, जिल्हा, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पुणे-बंगलोर महामार्गावर यमगर्णीजवळ गुरुवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा पोलीसप्रमुख रविकांते गौडा यांच्या सूचनेनुसार जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख वीरेश दोडमनी, जिल्हा क्राईम बँॅ्रचचे सीपीआय बी. एस. पाटील व फौजदार टी. बी. निलगार यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी १ कोटी ३६ लाख रुपये किमतीचे सुमारे २८४.४ किलो चांदीचे तयार दागिने व कार जप्त केली आहे.