जिल्ह्यात नवे २८८ रूग्ण, चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:25 AM2021-04-08T04:25:11+5:302021-04-08T04:25:11+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसून गेल्या ...

288 new patients die in the district | जिल्ह्यात नवे २८८ रूग्ण, चौघांचा मृत्यू

जिल्ह्यात नवे २८८ रूग्ण, चौघांचा मृत्यू

Next

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसून गेल्या २४ तासात २८८ नवे रूग्ण नोंदवण्यात आले आहेत. तर चौघांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरामध्ये ८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या १,४६४ रूग्ण उपचार घेत आहेत.

सलग काही दिवस कोरोना रूग्णांच्या संख्येने दोनशेचा टप्पा ओलांडला आहे. या २८८ नव्या रूग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील १२७ जणांचा समावेश आहे. तर नगरपालिका क्षेत्रातील ४१ आणि अन्य जिल्ह्यातील २७ जणांचा समावेश आहे. आजरा तालुक्यात ९,भुदरगड तालुक्यात बारा, गडहिंग्लज ११, गगनबावडा एक, हातकणंगले १३, कागल दोन, करवीर २४, पन्हाळा एक, राधानगरी दोन, शाहूवाडी दोन, शिरोळ १६ अशी अन्य तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची दिवसभरातील आकडेवारी आहे.

दिवसभरामध्ये ८०३ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून २,०७० जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. २४१ जणांची ॲंटीजेन चाचणी करण्यात आली आहे. तर ८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथील ४१ वर्षीय महिला, भारतीनगर मोरेवाडी येथील ६७ वर्षीय पुरुष, कसबा बावडा येथील ६० वर्षांची महिला आणि जरगनगर येथील ७५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

रूग्णांची वाढती संख्या पाहता सीपीआरसह जिल्ह्यातील २१ शासकीय रूग्णालयांमध्ये सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून रूग्णसंख्या वाढणार हे गृहित धरून त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.

चौकट

कोल्हापूर शहरातील कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील एकूण रूग्णांपैकी निम्मे रूग्ण कोल्हापुरातील असताना असे आकडेवारी सांगते. त्यामुळे शहरात अधिक काळजी घेण्याची गरज आहे. गरज नसताना बाहेर न पडणे आणि मास्कचा सक्तीचा वापर आवश्यक आहे. अन्यथा ही संख्या वाढतच जाण्याची भीती आहे.

चौकट

सर्वात जास्त रूग्ण कोल्हापूर १२७

सर्वात कमी रूग्ण चंदगड ००

गगनबावडा,पन्हाळा : प्रत्येकी १

कागल,राधानगरी,शाहूवाडी : प्रत्येकी २

डिस्चार्ज ८९

Web Title: 288 new patients die in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.