सीए परीक्षेत कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांची बाजी, गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच 'इतके' विद्यार्थी झाले उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 11:26 AM2022-02-11T11:26:54+5:302022-02-11T11:30:33+5:30

कोल्हापूरमधील चारशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती

29 students from Kolhapur pass the Chartered Accountant Examination | सीए परीक्षेत कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांची बाजी, गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच 'इतके' विद्यार्थी झाले उत्तीर्ण

सीए परीक्षेत कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांची बाजी, गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच 'इतके' विद्यार्थी झाले उत्तीर्ण

googlenewsNext

कोल्हापूर : चार्टर्ड अकौटंट (सीए) अभ्यासक्रमाची डिसेंबरमध्ये अंतिम परीक्षा झाली. या परीक्षेचा निकाल दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) गुरुवारी ऑनलाइन जाहीर झाला. त्यात कोल्हापुरातील २९ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत बाजी मारली आहे. गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच कोल्हापूरमधील इतके विद्यार्थी सीए परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

कोल्हापूरमधील चारशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यांपैकी २८ जण उत्तीर्ण झाले आहेत. त्यात सम्मेद सुभाष गाट, साहिल विष्णुकुमार चंदवाणी, मिहीर चारूदत्त महाजनी, पार्थ जितेंद्र पटेल, रोहन राजेंद्रकुमार पाटील, श्रेयश मुकुंद एतावडेकर, जयदीप सत्त्वशील जाधव, रिचा अशोक वेर्णेकर, साहिल वरियल दुल्हानी, मृगांक मिलिंद गोगटे, मोनिका खेतालाल भावाणी, 

श्रुती रावसाहेब पाटील, तन्वी सुकुमार होनाळे, प्रिया मनोहर मते, ऋतुजा महेश रायबागकर, शारंग संजय मांगलेकर, विक्रम सचिन घाटगे, मीरा सुवर्णसिंग हजारे, पीयूष प्रेमचंद रोहिडा, तन्मय लालासो पाटील, एकता राजकुमार दुल्हानी, धनश्री दिनकर नलवडे, पृथ्वी विशाल शेठ, आरती अशोक दिवटे, प्रतीक दीपक दिवटे, 

अभिषेक विचारे, किरण चौधरी, निखिल शर्मा यांचा समावेश आहे. त्यांना आयसीएआयच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष तुषार अंतुरकर, उपाध्यक्ष सुशांत गुंडाळे, सचिव चेतन ओसवाल, खजानीस अमित शिंदे, माजी अध्यक्ष अनिल चिकोडी यांचे मार्गदर्शन लाभले.

गेल्या परीक्षेत २३ जणांचे यश

- वर्षातून दोन वेळा ‘आयसीएआय’कडून परीक्षा घेण्यात येते. 

- जुलैमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल सप्टेंबरमध्ये जाहीर झाला होता. त्यात कोल्हापूरच्या २३ जणांनी यश मिळविले होते.

गेल्या दोन वर्षांपासून सीए परीक्षेतील यशाचा कोल्हापूरचा टक्का वाढत आहे. या वर्षी पहिल्यांदाच २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. - तुषार अंतुरकर, अध्यक्ष, आयसीएआय कोल्हापूर.
 

Web Title: 29 students from Kolhapur pass the Chartered Accountant Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.