एस.टी.ला मालवाहतुकीतून ३ कोटी ४५ लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:28 AM2021-06-09T04:28:48+5:302021-06-09T04:28:48+5:30
कोल्हापूर : राज्य परिवहन मार्ग महामंडळाने लाॅकडाऊन काळात प्रवासी वाहतुकीला पर्याय म्हणून ना नफा ना तोटा या तत्त्वावर ...
कोल्हापूर : राज्य परिवहन मार्ग महामंडळाने लाॅकडाऊन काळात प्रवासी वाहतुकीला पर्याय म्हणून ना नफा ना तोटा या तत्त्वावर मालवाहतूक सुरू केली. यातून कोल्हापूर विभागाला ३ कोटी ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी सेवेच्या माध्यमातून राज्यभरात आपले जाळे विणले आहे. या सेवेवरही प्रवाशांचा प्रचंड विश्वास सार्थ ठरला आहे. मात्र, गेल्या वर्षभरात कोरोनाच्या कहरामुळे लाॅकडाऊन लागू झाले. त्यामुळे प्रवासी वाहतूक बंद झाली.
उत्पन्न घटल्यामुळे पगार, बसचे मेंटेनन्स आदी खर्च कसे काढायचे, असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर महामंडळाने मार्ग काढीत राज्यातील ११०० बसचे रूपांतर मालवाहतूक ट्रकमध्ये केले. यात कोल्हापूर विभागाच्या ५० बसचाही समावेश होता. या ५० बसद्वारे या विभागाने २१ मे २०२० ते आजतागायत ३ कोटी ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. खासगी मालवाहतुकीच्या दरापेक्षा एस.टी.चे दर स्वस्त होते. त्यामुळे या सेवेला उदंड प्रतिसाद लाभला. पाच हजारांहून अधिक राज्यातील गडचिरोलीसह कर्नाटक, गोवा, आदी भागांत ही सेवा दिली. त्यातून ३ कोटी ४५ लाख रुपये उत्पन्न मिळवले. यातून कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले, इंधन खर्च, वीज बी आणि काहीअंशी कर्मचाऱ्यांचा पगार ही करण शक्य झाली.
पाॅइंटर
- मालवाहतूक ट्रकमध्ये रूपांतरित केलेल्या बसची संख्या -५०
- विभागातून झालेल्या फेऱ्यांची संख्या - ५ हजार ८२४
- बसने कापलेले अंतर - ८ लाख ३५ हजार ६०५ कि.मी.
- वर्षभरात मिळालेले उत्पन्न - ३ कोटी ४४ लाख ५४ हजार ७१० रुपये
-१०० कि.मी.पर्यंत ४६ रुपये आणि त्यापुढील कि.मी.साठी ४४ रुपये इतका दर निश्चित आहे.
शासकीय कार्यालयांनाही मालवाहतुकीसाठी सक्ती
राज्य शासनाने एस.टी.च्या मालवाहतुकीमधून मिळालेले उत्पन्न पाहून ही सेवा सर्व शासकीय कार्यालयाने २५ टक्के घेणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी महामंडळाचे अधिकारी सर्व कार्यालयाने भेट देत आहे. याशिवाय खासगी कंपन्या, आस्थापनांनाही सेवेविषयी माहिती देत आहेत.
कोट
खासगी मालवाहतुकीपेक्षा महामंडळाचा प्रति कि.मी.चा दर कमी आहे. याशिवाय विश्वासार्हता महत्त्वाची मानून शासनाच्या विविध विभागांसह खासगी संस्था, आस्थापनांनी आपल्या सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे उत्पन्न मिळवता आले आहे.
- शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी, कोल्हापूर विभाग
-