मडिलगे बुद्रूक गावच्या नळपाणीपुरवठा योजनेस ३ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:15 AM2021-06-30T04:15:40+5:302021-06-30T04:15:40+5:30
मडिलगे बुद्रूक हे गाव भुदरगड तालुक्यातील गारगोटी शहरानंतरचे मोठे गाव आहे. त्याची लोकसंख्या ६ हजार हून अधिक आहे. १९८१ ...
मडिलगे बुद्रूक हे गाव भुदरगड तालुक्यातील गारगोटी शहरानंतरचे मोठे गाव आहे. त्याची लोकसंख्या ६ हजार हून अधिक आहे. १९८१ साली वेदगंगा नदीकाठी जॅकवेल बांधण्यात आला असून, सध्या त्याची स्थिती बिकट झालेली आहे.
अस्तित्वात असणारी एक लाख लिटर क्षमतेची टाकी निकामी झालेली असून वापरास अयोग्य आहे. त्यामुळे गावाकरिता नवी पाणीपुरवठा योजना होणे अत्यंत आवश्यक होते. यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासोबत राहुरी विद्यापीठाचे संचालक दत्तात्रय उगले, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी पाठपुरावा करत होते. त्याला मूर्त स्वरूप आले असून जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाकडून ३ कोटी रुपयांची तत्वत: मंजुरी मिळालेली आहे. त्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने आमदार आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी राहुरी कृषी विद्यापीठचे संचालक दत्ताजीराव उगले, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, जिल्हा केमिस्ट असो. सचिव शिवाजीराव ढेंगे, सरपंच शुभांगी परीट, उपसरपंच महेंद्र देसाई, संजय देसाई, युवराज सुर्वे, बाबूराव कांबळे, रणजित ढेंगे, मोहन कळके, अभिषेक ढेंगे, मकरंद सोनार, पिंटू परीट यांच्यासह ग्रामपंचायत मडिलगे बु.चे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : मडिलगे बुद्रूक गावच्या नळपाणीपुरवठा योजनेस तत्वत: मंजुरी मिळाल्याबद्दल सत्कार करताना दत्ताजीराव उगले, नंदकुमार ढेंगे, शिवाजी ढेंगे, सरपंच शुभांगी परीट, युवराज सुर्वे, संजय देसाई आदी मान्यवर.