१३३२ जणांकडून ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:03+5:302021-05-29T04:20:03+5:30

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यानुसार १३३२ जणांकडून ३ लाख १२ हजार ...

3 lakh 12 thousand 500 fine recovered from 1332 persons | १३३२ जणांकडून ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

१३३२ जणांकडून ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

googlenewsNext

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यानुसार १३३२ जणांकडून ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड पोलिसांनी शुक्रवारी वसूल केला. विनाकारण फिरणाऱ्या ८५ जणांची वाहने जप्त केली.

दिवसभरात २७२ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. त्यात ६१,९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मोटारवाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी १३३२ जणांवर खटले दाखल करून त्यांच्याकडून ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. विनाकारण फिरणाऱ्या ८५ जणांची वाहने जप्त करण्यात आली. दोन जणांवर गुन्हे दाखल केले. याशिवाय २४ आस्थापनांवर गुन्हे नोंद करण्यात आले. त्यांच्याकडूनही १३ हजार २०० रुपये दंड भरून घेण्यात आला. माॅर्निंग वाॅकला गेलेल्या १९ जणांवरही कारवाई करीत २ हजारांचा दंड करण्यात आला.

आजपर्यंतची कारवाई अशी

- मास्क कारवाई - २१८५२ जणांकडून ४८ लाख ७२ हजार ९६३ दंड वसूल

-वाहन जप्त - ७३६३

- मोटर वाहन केसेस - ८२८९६

- मोटार वाहन दंड - १कोटी ४५ लाख ६१ हजार ८००

-गुन्हे दाखल - ९८

-आस्थापना कारवाई- ४४२

- आस्थापनांवर दंड - ५ लाख ६१ हजार ८००

- माॅर्निंग वाॅक - २४८६

-माॅर्निंग वाॅक दंड - ८ लाख ८१ हजार ९७०

Web Title: 3 lakh 12 thousand 500 fine recovered from 1332 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.