करवीर महसूलकडून कोविडसाठी ३ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:17 AM2021-06-06T04:17:28+5:302021-06-06T04:17:28+5:30

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा पगार कोरोना वैद्यकीय उपकरणांसाठी दिला. या मदतीतून जमा झालेल्या ...

3 lakh fund for Kovid from Karveer Revenue | करवीर महसूलकडून कोविडसाठी ३ लाखांचा निधी

करवीर महसूलकडून कोविडसाठी ३ लाखांचा निधी

Next

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा पगार कोरोना वैद्यकीय उपकरणांसाठी दिला. या मदतीतून जमा झालेल्या ३ लाख २० हजारांच्या रकमेतून तालुक्यातील चार कोविड केअर सेंटरसाठी उपकरणे देण्यात आली.

तालुक्यातील केआयटी मुलांचे वसतिगृह, कुरुकली, कुडीत्रे व शिंगणापूर येथील कोविड केअर सेंटरसाठी ५० ऑक्सिफ्लो मीटर आणि २ लाख किमतीची औषधे आरोग्य अधिकारी गुणाजी नलवडे यांच्याकडे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी सुपूर्द केले. या सामाजिक कार्यात प्रांताधिकारी नावडकर यांच्यासह तहसीलदार शीतल मुळे-भांबरे, नायब तहसीलदार बिपीन लोकरे, रूपाली सूर्यवंशी यांच्यासह करवीर तहसील, प्रांत कार्यालयातील कर्मचारी, तलाठी मंडल अधिकारी तसेच भूमीअभिलेख, गटविकास अधिकारी, सहकार विभागाचे अधिकाऱ्यांनी योगदान दिले.

---

०५०६२०२१-कोल-करवीर महसूल

ओळ : करवीर तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पगारातून जमा केलेल्या निधीतून येथील कोविड केअर सेंटरसाठी उपकरणे दिली. प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी हे साहित्य आरोग्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.

---

Web Title: 3 lakh fund for Kovid from Karveer Revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.