हिंडगावमध्ये ३ लाखांची दारू पडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:16 AM2021-06-30T04:16:31+5:302021-06-30T04:16:31+5:30
याप्रकरणी कॉन्स्टेबल वैभव शंकर गवळी यांनी फिर्याद दाखल केली असून, आरोपी सुरेश बाबजी गावडे (वय ४९, रा. इ. खासकीरवाडा, ...
याप्रकरणी कॉन्स्टेबल वैभव शंकर गवळी यांनी फिर्याद दाखल केली असून, आरोपी सुरेश बाबजी गावडे (वय ४९, रा. इ. खासकीरवाडा, सावंतवाडी), दशरथ अर्जुन सावंत (वय ४४, रा. गवसे, ता. चंदगड) यांना ताब्यात घेतले आहे. या दोघांना मंगळवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास हिंडगाव गावामध्ये रोडच्या बाजूस डंपरच्या आडोशाला लपले असताना त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर चंदगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपीने बेकायदा बिगर परवाना बेकायदा गोवा बनावटीचा प्रोव्ही गुन्ह्याचा ३ लाख १३ हजार २२४ रुपये किमतीचा मुद्देमाल महाराष्ट्र राज्याचा कर चुकवून बेकायदेशीर त्याची विक्री करण्याकरिता घेऊन येत होता. त्याबाबतची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी हिंडगाव येथे सापळा रचून त्यांना पकडले. या कारवाईत ३ बॉक्स गोल्ड अॅण्ड ब्लॅक, ट्रीपल एक्स रम, २४ बॉक्स गोल्डन आईस ब्ल्यू व्हिस्की, २ बॉक्स रिजर्व सेवन व्हिस्की व एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी ओमीनी (एम ०७, एबी २०२७) असा एकूण ३ लाख १३ हजार २२४ असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तपास पो. ना. सुतार, पो. ना. महापुरे करत आहेत.
फोटो ओळी : चंदगड पोलिसांनी पकडलेली दारू व आरोपी.
क्रमांक :२९०६२०२१-गड-०८