३ लाखांची अवैध दारू जप्त, दाणोली बाजारपेठेतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 07:57 PM2019-05-15T19:57:47+5:302019-05-15T19:59:23+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने आंबोली रस्त्यावर दाणोली बाजारपेठ येथे रविवारी रात्री ११ वाजता गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत ३ लाखांच्या दारुसह एकूण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच बिगरपरवाना गोवा बनावटीच्या दारुची अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी नामदेव भिमाना सावंत (४८, रा. चंदगड, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले आहे.
सिंधुदुर्गनगरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने आंबोली रस्त्यावर दाणोली बाजारपेठ येथे रविवारी रात्री ११ वाजता गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत ३ लाखांच्या दारुसह एकूण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच बिगरपरवाना गोवा बनावटीच्या दारुची अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी नामदेव भिमाना सावंत (४८, रा. चंदगड, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले आहे.
आंबोली घाटमार्गावरून गोवा बनावटीच्या अवैध दारुची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर उपायुक्त व सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस येथील भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, आर. डी. ठाकूर, एम. एस. पवार, एस. जी. मुपडे, दीपक वायदंडे यांच्या टीमने रविवारी रात्रीपासून आंबोली घाट मार्गावर सापळा रचला होता. त्यानुसार रात्री ११ च्या सुमारास या पथकाने आंबोली घाटात एका कारला (एम. एच. ४३, एल. ०८४२) या पथकाने थांबण्याचा इशारा केला होता.
कारचालक चंदगडमधील
दाणोली बाजारपेठ येथे थांबवून ही गाडी तपासली असता कारमध्ये एकूण ३ लाख रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू आढळली. या दारूसह दारू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली २ लाखांची कार असा एकूण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गोवा बनावटीची बिगर परवाना अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी कारचालक नामदेव भिमाना सावंत (रा. नागनवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले आहे.