कोल्हापूर जिल्ह्यातील निवारागृहांमध्ये परराज्यातील ६२३ जण ; राज्यातील १८१ जणांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 11:18 AM2020-04-16T11:18:08+5:302020-04-16T11:20:05+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील १६ निवारागृहांमध्ये राज्यातील १८१ आणि परराज्यातील ६२३ अशा एकूण ८०४ जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे, ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील १६ निवारागृहांमध्ये राज्यातील १८१ आणि परराज्यातील ६२३ अशा एकूण ८०४ जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी दिली.
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालयात राज्यातील २३ परराज्यांतील ६ असे २९ जण, रामकृष्ण हॉल (लोणार वसाहत) मध्ये राज्यातील २०, परराज्यांतील ९ असे २९ जण, मुलींची शाळा क्रमांक सहा (लाईन बाजार) येथे राज्यातील ९ परराज्यांतील ११ असे एकूण २० जण आहेत. करवीर तालुक्यातील उजळाईवाडी येथील सरस्वती मंगल कार्यालयामध्ये राज्यातील २, परराज्यांतील ३५ एकूण ३७ जण, तर डी. फार्मसी कॉलेजमध्ये राज्यातील ९, परराज्यांतील ३५ असे एकूण ४४ जण आहेत.
कागल तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात राज्यातील २, परराज्यांतील ९७ एकूण ९९ जण आहेत. जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील २६, परराज्यांतील १०३ असे एकूण १२९ जण आणि हातकणंगले तालुक्यामध्ये निवासी गुरुकुल वडगाव येथे राज्यातील २, परराज्यांतील ८५ असे एकूण ८७ जण, अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव राज्यातील ३ परराज्यांतील १०३ असे एकूण १०६ जण, इचलकरंजीतील शहरी बेघर निवारा केंद्रात राज्यातील ४५ परराज्यांतील ८ एकूण ५३ जण आहेत.
शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील शाळा क्रमांक एकमध्ये राज्यातील १३, परराज्यांतील १७ असे एकूण ३०, तर जैन सांस्कृतिक भवन कुरुंदवाड येथे परराज्यांतील चार आणि उर्दू हायस्कूल जयसिंगपूर येथे परराज्यांतील १२ जण आहेत. गडहिंग्लजमधील देवदासी छात्र वसतिगृहात राज्यातील ९, परराज्यांतील एक असे एकूण १० जण, तर गगनबावडा तालुक्यातील माधव विद्यालयात राज्यातील १३ जण, समाज कल्याण निवासी शाळा वसतिगृहात राज्यातील पाच आणि परराज्यांतील ९७ असे एकूण १०२ जण आहेत.
अन्य राज्यातील व्यक्ती
कर्नाटक : २२८
तमिळनाडू : २०९
राजस्थान : ८६
मध्यप्रदेश : ४७
उत्तर प्रदेश : २९
केरळ : ८
पाँडेचरी, पश्चिम बंगाल : प्रत्येकी एक
आंध्रप्रदेश : ३
झारखंड : ५
बिहार : २
हरियाणा : ४