दरवर्षी १००० टन ई-कचरा कोल्हापुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 01:15 AM2020-02-28T01:15:54+5:302020-02-28T01:17:47+5:30
महापालिकांकडेही वेगळी यंत्रणा नाही. महानगरपालिकेकडे १३ प्रभागांतून घंटागाडीद्वारे रोज सुमारे १८० टन कचरा जमा होतो. त्यात ८० टन कचरा सुका असतो. मात्र, ई-कचरा केवळ ५० किलो जमा होतो. तो ग्रीन एनर्जी या खासगी कंपनीकडे सुपूर्द केला जातो. शहरातील अनेक रद्दीवाले आणि स्कॅ्रपवाल्यांकडे मिळून वर्षाला १००० टन ई-कचरा जमा होतो; परंतु
संदीप आडनाईक ।
कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात रोज जमा होणारा ओला आणि सुका कचरा एका जागेत साठवून त्याचे निराकरण केले जाते. तसेच बांधकाम क्षेत्रातील कचरा, रुग्णालयांचा जैव-वैद्यकीय कचरा, औद्योगिक आणि रासायनिक कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित कचºयाच्या विल्हेवाटीची यंत्रणा असली तरी आरोग्याला घातक असलेल्या दरवर्षी साठणा-या हजारो टन ई-कचºयाच्या विल्हेवाटीची स्वतंत्र यंत्रणा मात्र कोल्हापुरात नाही. हा कचरा चक्क नाला-ओढ्यांत टाकला जात असल्यामुळे कॅन्सरसह गंभीर आजारांना निमंत्रण मिळत आहे.
आरोग्याला घातक असल्यामुळे ई-कचरा इतर कचºयाबरोबर टाकायचा नसतो किंवा जमिनीत गाडायचाही नसतो; परंतु अनेकांना हे माहीतच नसल्यामुळे हा कचरा शहरात इतस्तत: विखुरलेला दिसतो. त्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होत आहे. या कचºयाच्या विल्हेवाटीसाठी महापालिकांकडेही वेगळी यंत्रणा नाही. महानगरपालिकेकडे १३ प्रभागांतून घंटागाडीद्वारे रोज सुमारे १८० टन कचरा जमा होतो. त्यात ८० टन कचरा सुका असतो. मात्र, ई-कचरा केवळ ५० किलो जमा होतो. तो ग्रीन एनर्जी या खासगी कंपनीकडे सुपूर्द केला जातो. शहरातील अनेक रद्दीवाले आणि स्कॅ्रपवाल्यांकडे मिळून वर्षाला १००० टन ई-कचरा जमा होतो; परंतु त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट होत नाही. विशेषत: लक्ष्मीपुरीतील फोर्ड कॉर्नरजवळील एका जागेत शहरातील सर्वाधिक ई-कचरा एकत्रित केला जातो, असा हजारो टन इ-कचरा साठून आहे.
ई-कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्रमाण टीव्ही, मोबाईलचे
इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरून खराब झाली की त्यांचा ई-कचरा होतो. यामध्ये प्रामुख्याने टी.व्ही. संच, मोबाईल, संगणक, प्रिंटर, मॉनिटर, सीडी, चार्जर व सर्व प्रकारच्या बॅटºया यांचा समावेश मोठा आहे. अशा प्रकारच्या जमा होणा-या कच-यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे टी.व्ही. आणि मोबाईलचे आहे.
किलोमागे जास्तीत जास्त पैसे मिळत असल्यामुळे आणि या कचऱ्याबाबत जनजागृती नसल्यामुळे अनेक नागरिक पैसे घेऊन स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतात; कारण हा कचरा हे स्क्रॅपवाले त्यातील धातू काढून घेऊन घातकपणे नष्ट करतात आणि त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही.
- मनोज मेहता, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महालक्ष्मी ई-सायकलर्स प्रा. लि.