महास्वच्छता अभियानात ७ टन कचरा, प्लास्टिक उठाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 11:32 AM2020-03-10T11:32:54+5:302020-03-10T11:34:57+5:30
महास्वच्छता अभियानामध्ये ७ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा ४५ वा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
कोल्हापूर : महास्वच्छता अभियानामध्ये ७ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा ४५ वा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
यावेळी उपायुक्त निखील मोरे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उप शहर अभियंता हर्षजित घाटगे, शाखा अभियंता आर. के. पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, स्वरा फौंडेशनचे प्रमोद माजगावकर, विवेकानंद कॉलेज एन. एस. एस.चे विद्यार्थी, स्वच्छता दूत अमित देशपांडे, कोल्हापूर फ्लोबर्स ग्रुप, युवा मंच ताराराणी हायस्कूल राजारामपुरी, तपोवन मैदान येथे महिला दिनानिमित्त प्लास्टिक व थर्माकोल मुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली.
तीन डंपर प्लास्टिक
तपोवन ग्राऊंड, गांधी मैदान, पंचगंगा नदी घाट, रिलायन्स मॉल संपूर्ण परिसर, जयंती नदी पंपींग स्टेशन, हुतात्मा पार्क तसेच कमला कॉलेज, उषाराजे हायस्कूल ग्राउंडची सफाई, टाकाळा येथील चॅनल सफाई, जयंती नदी संप व पंप हाऊस बंधारा येथील तीन डंपर प्लास्टिक उठाव करण्यात आला.
महापालिकेची यंत्रणा
- ४ जेसीबी
- ५ डंपर
- ६ आरसी गाड्या
- १५० महापालिकेचे कर्मचारी