पन्हाळ्याजवळ आरामबस कोसळून ३० जखमी

By admin | Published: February 22, 2016 12:39 AM2016-02-22T00:39:05+5:302016-02-22T01:07:59+5:30

सर्वजण मुंबईचे : चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

30 injured in relief in Panhala | पन्हाळ्याजवळ आरामबस कोसळून ३० जखमी

पन्हाळ्याजवळ आरामबस कोसळून ३० जखमी

Next

कोल्हापूर/देवाळे : पन्हाळा पाहून कोल्हापूरकडे निघालेली खासगी आरामबस (ट्रॅव्हल्स) बांबरवाडी गावच्या हद्दीत मोठ्या नागमोडी वळणावर झाडाला धडकून सुमारे २५ फूट खोल शेतजमिनीत कोसळून झालेल्या अपघातात चालकासह मुंबईचे तीस प्रवासी गंभीर जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी दुपारी दोन वाजता हा अपघात झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खासगी प्रवासी बसमधून (एमएच-०४ एफएक्स ४६४९) रविवारी सकाळी मुंबईहून सुमारे ३५ पर्यटक पन्हाळगड येथे आले होते. दुपारी दोनच्या सुमारास ते पन्हाळ्यावरून कोल्हापूरकडे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघाले. बांबरवाडी (ता. पन्हाळा) गावाजवळ चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याकडील झाडाला धडकून सुमारे २५ फूट खोल शेतजमिनीत कोसळली. यावेळीे मोठा आवाज झाला. त्यामुळे प्रवासी व ग्रामस्थांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. रस्त्याकडेला तीव्र उतार असल्याने व अपघातात बसचा चक्काचूर झाल्यांने जखमींना बसमधून बाहेर काढणे मुुश्कील झाले होते. मात्र, येथील ग्रामस्थ, प्रवाशांनी ३० जखमींना बाहेर काढले व त्यांना तत्काळ उपचारासाठी सी.पी.आर.मध्ये दाखल केले. अपघाताची नोंद पन्हाळा पोलिसांत झाली आहे.
दरम्यान , सीपीआरमध्ये अचानकपणे इतक्या मोठ्या प्रमाणात जखमी दाखल झाल्याने रुग्णालय प्रशासनाची धांदल उडाली. जादा डॉक्टरांची कुमक मागविण्यात आली. काही जखमी पर्यटकांवर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृती गंभीर असलेल्या पर्यटकांना प्राथमिक उपचार करून राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश असल्याने पालक भेदरून गेले होते. अनेकांच्या डोक्याला, हाता-पायांना गंभीर दुखापती झाल्या होत्या. अपघाताचे वृत्त मुंबई येथील जखमींच्या नातेवाइकांना समजताच ते कोल्हापूरकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जखमींची नावे अशी : ंमंथन महेश घाणेकर (वय ७), साक्षी घाणेकर (२६), वेदा सचिन जडियार (४), संदीप सचिन जडियार (१२), महेश बाबू घाणेकर (३२), रोहिणी रामचंद्र गांगरकर (२२), अनुजा सचिन जडियार (३५), सुनंदा लक्ष्मण पकडे (५५), दीक्षा राजेश घाणेकर (३५), किशोर जनार्दन धुरी (२५), ओमकार रामचंद्र गांगरकर (१६), लक्ष्मण बाबू खोबडे (६५), प्रसाद नामदेव इंदुलकर (४६), योगेश शिगवण इंदुलकर (२८), जान्हवी शिगवण इंदुलकर (२६), प्रेम शिगवण इंदुलकर (४), रोशन प्रभाकर परब (२९, सर्व रा. भांडुप, मुंबई), प्रकाश कृष्णा दिवाळे (३२), लक्ष्मी धोंडू पडे (४५), प्राप्ती प्रकाश दिवाळे (२५), श्रावणी शरद कातकर (२८), शरद रामचंद्र कातकर (३८), सारा शरद कातकर (७), पार्थ शरद कातकर (४), सुशील सोनू जडियार (२८), संजय महादेव दिवाळे (३२), वैशाली तुकाराम उदेक (४८), तुकाराम सोनू उदेक (५०), तेजस तुकाराम गांगरकर (१६, सर्व रा. घाटकोपर, मुंबई).

Web Title: 30 injured in relief in Panhala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.