जोतिबा यात्रेत ३० हजार लिटर सरबत वाटप -पाटीदार युवक मंडळाचा उपक्रम; सलग १५व्या वर्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 06:04 PM2019-04-19T18:04:13+5:302019-04-19T18:05:42+5:30
येथील श्री कोल्हापूर पाटीदार सनातन युवक मंडळातर्फे श्री जोतिबाच्या यात्रेत यावर्षी यात्रेकरूंना सुमारे ३० हजार लिटर कोकम सरबत शुक्रवारी मोफत वाटप करण्यात आले. या मंडळातर्फे सलग १५ व्या वर्षी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
कोल्हापूर : येथील श्री कोल्हापूर पाटीदार सनातन युवक मंडळातर्फे श्री जोतिबाच्या यात्रेत यावर्षी यात्रेकरूंना सुमारे ३० हजार लिटर कोकम सरबत शुक्रवारी मोफत वाटप करण्यात आले. या मंडळातर्फे सलग १५ व्या वर्षी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
जोतिबा डोंगरावरील गायमुखजवळ असलेल्या वळणाच्या ठिकाणी मोफत कोकम वाटप उपक्रम राबविण्यात आला; त्यासाठी मंडळाचे सुमारे ५00 कार्यकर्ते सकाळी सात वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत सेवेत होते. यात्रेच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन कोकम देण्यात आले. पर्यावरण रक्षणाचा विचार करून मंडळाने प्लास्टिकऐवजी स्टीलच्या ग्लासमधून सरबत वाटप केले. या उपक्रमाचे उद्घाटन पाटीदार समाजाचे अध्यक्ष गोपाळ पटेल, उपप्रमुख खेमसी पटेल, सचिव डाह्या पटेल, हरी पटेल, देवसी पटेल, महिला मंडळाच्या अध्यक्ष गोदावरी पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. युवक मंडळाचे अध्यक्ष हरेश पटेल, उपप्रमुख तुलसी पटेल, महेश पटेल, सचिव भीखालाल पटेल, जनसंपर्क अधिकारी मगन पटेल, शंकर पटेल, प्रवीण पटेल, नरेंद्र पटेल, भावेश गोराणी, गोविंद पटेल, ईश्वर पटेल, आदींनी या उपक्रमात योगदान दिले.