एका पॉझिटिव्ह रूग्णामागे शासन करतेय ३० हजार खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:22 AM2021-04-24T04:22:48+5:302021-04-24T04:22:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर केंद्र असो किंवा राज्य सरकार असो, सार्वजनिक आरोग्य ...

30,000 is spent on a positive patient | एका पॉझिटिव्ह रूग्णामागे शासन करतेय ३० हजार खर्च

एका पॉझिटिव्ह रूग्णामागे शासन करतेय ३० हजार खर्च

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर केंद्र असो किंवा राज्य सरकार असो, सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला जितके महत्त्व देणे आवश्यक होते तेवढे न दिले गेल्याने कोरोना महामारीच्या या लाटांमध्ये जोरदार झटका बसल्याचे वास्तव दिसून आले आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने गेल्यावर्षी आणि आत्ता ही त्यांच्याकडून जे जे काही त्यांच्या मर्यादेत करणे शक्य आहे ते करण्याला प्राधान्य दिले. लक्षणे नसलेला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ते व्हेंटिलेटर लावलेला रूग्ण अशा रूग्णांचा सरासरी खर्च काढला तर शासन एका रूग्णामागे किमान ३० हजार रूपये खर्च करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय रूग्णालयात बऱ्या झालेल्या रूग्णांवर किमान १२० कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ६० हजार कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण नोंदवण्यात आले आहेत. यातील ३० टक्के हून अधिक रूग्णांनी खासगी रूग्णालयात किंवा घरी ,हॉटेलमध्ये उपचार घेतले असे गृहित धरले तरी किमान ४० हजार रूग्णांनी शासकीय रूग्णालयांमध्ये कोरोनाचे उपचार घेतले आहेत.

लक्षणे नसलेल्या रूग्णाने घरीच उपचार घेतले तरी त्यासाठी किमान अडीच हजार रूपये खर्च येतो. लक्षणे नसलेला, लक्षणे असलेला, मार्कर टेस्ट करावी लागणारा, रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असणारा आणि व्हेंटिलेटरवर आयसीयूमध्ये ठेवलेला असे रूग्णांचे प्रकार विचारात घेता किमान अडीच हजारांपासून ते ६५ हजारापर्यंत प्रति रूग्ण खर्च येतो. सर्वच रूग्णांना रेमडेसिविर लागत नाही. व्हेंटिलेटर लागत नाही. आयसीयूमध्ये ठेवावे लागत नाही. म्हणूनच सरासरी ३० हजार रूपये खर्च काढला तरी ४० हजार रूग्णांवर आतापर्यंत १२० कोटी रूपये थेट खर्च झालेले आहेत.

चौकट

लक्षणे नसलेल्या पाॅझिटिव्ह रूग्णासाठीचा शासकीय खर्च

घरीच राहणे अपेक्षित

रूग्णाची आरटीपीसीआर चाचणी १,००० रूपये

व्हिटॅमीन, ॲंटीबायोटिक गोळ्या १,००० रूपये

अन्य खर्च ५०० रूपये

एकूण २५०० रूपये

चौकट

लक्षणे असलेल्या रूग्णांसाठीचा खर्च

आरटीपीसीआर चाचणी १,००० रूपये

व्हीटॅमीन, ॲंटीबायोटिक गोळ्या ४,००० रूपये

एचआरसीटी २,५०० रूपये

कोविड केअर सेंटरमध्ये वास्तव्य ४,५०० रूपये

एकूण खर्च १२ हजार रूपये

चौकट

ऑक्सिजन पातळी कमी असलेला रूग्ण

आरटीपीसीआर टेस्ट १,००० रूपये

एचआरसीटी टेस्ट २,५०० रूपये

मार्कर टेस्ट ४,००० रूपये

राहणे, जेवण व इतर खर्च १२,५०० रूपये

एकूण खर्च २० हजार रूपये

चौकट

रेमडेसिवेरची गरज असलेला रूग्ण

आरटीपीसीआर टेस्ट १,००० रूपये

एचआरसीटी टेस्ट २,५०० रूपये

मार्कर टेस्ट ४,००० रूपये

रेमडेसिविर ९,००० रूपये

विविध औषधे, गोळ्या ५,००० रूपये

राहणे, जेवणे, पीपीई किट खर्च १२,५०० रूपये

एकूण खर्च ३४ हजार रूपये

चौकट

व्हेंटिलेटर लावलेला रूग्ण

आरटीपीसीआर टेस्ट १,००० रूपये

एचआरसीटी टेस्ट २,५०० रूपये

मार्कर टेस्ट ४,००० रूपये

रेमडेसिविर ९,००० रूपये

विविध औषधे, गोळ्या ५,००० रूपये

राहणे, जेवणे, पीपीई किट खर्च १२,५०० रूपये

व्हेेंटिलेटर, आयसीयू खर्च ३०,००० रूपये

एकूण खर्च ६४ हजार रूपये

चौकट

हे सर्व उपचार करत असताना वैद्यकीय अधिकारी, परिचारिका या सर्वांच्या वेतनाचा खर्च यामध्ये गृहित धरण्यात आलेला नाही. कारण त्यांना मासिक वेतन असल्यामुळे रूग्णांच्या संख्येवर ते विभागले जाते. केवळ प्रत्यक्ष उपचाराचा हा खर्च आहे.

चौकट

मुलभूत सुविधांमधील गुंतवणूक वेगळीच

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आरोग्य क्षेत्रात केलेली मुलभूत गुंतवणूक यात धरलेली नाही. सीपीआर, आयजीएम, उपजिल्हा रूग्णालय गडहिंग्लज येथील ऑक्सिजन प्लांट पासून ते शेंडा पार्क येथे उभारण्यात आलेल्या प्रयोगशाळेपर्यंत, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या साधन सामुग्री पासून ते रूग्ण नियंत्रणासाठीच्या उपाय योजनांचा खर्च ही वेगळा आहे. त्याचा यामध्ये समावेश नाही.

चौकट

मग नागरिक म्हणून आपण काय करणार

कोल्हापूर जिल्ह्यातील रूग्णसंख्या वाढत आहे, रेमडेसिविर, ऑक्सिजनचा तुटवडा देशभरात आहे. त्याला कोल्हापूर अपवाद नाही. परंतु ५३ हजार रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यातील किमान ४० हजार रूग्ण शासकीय रूग्णालयांमध्ये बरे होऊन घरी परतले आहेत. ज्यांनी महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचार घेतले आहेत त्यांच्यावर खासगी दवाखान्यात ही मोफत उपचार करण्यात आले आहेत. इतके सगळे असताना मग नागरिक म्हणून कोरोना रोखण्याकरिता आपली काही जबाबदारी आहे याचा मात्र प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे.

Web Title: 30,000 is spent on a positive patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.