किटवडे ( ता. आजरा ) परिसरात ३०१ मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 10:51 AM2021-06-17T10:51:11+5:302021-06-17T10:53:38+5:30
Rain Satara-पावसाचे माहेरघर असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे परिसरात जून महिन्यातील गेल्या २० वर्षातील उच्चांकी पाऊस ३०१ मिलिमीटर इतका झाला आहे. तर तालुक्यातील धनगरवाडी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
सदाशिव मोरे
आजरा-पावसाचे माहेरघर असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे परिसरात जून महिन्यातील गेल्या २० वर्षातील उच्चांकी पाऊस ३०१ मिलिमीटर इतका झाला आहे. तर तालुक्यातील धनगरवाडी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
मुसळधार पावसाने तालुक्यातील साळगाव, दाभिल, शेळप, किटवडे, देवर्डे, चांदवाडी, हाजगोळी, भादवण, घाटकरवाडी, धनगरमोळा या बंधाऱ्यावर पाणी आले आहे. चित्री धरण ४५ टक्के भरले आहे.चित्री परिसरात १६६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
तालुक्यातील किटवडे परिसरात प्रतिवर्षी उच्चांकी पाऊस होतो. चालू वर्षी जून महिन्यातील उच्चांकी ३०१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आजरा १८१, गवसे १८२, उत्तुर १४२, मलिग्रे १३७ तर सरासरी १६१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धनगरवाडी धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के म्हणजे ९३ द.ल.घ.फू.ने भरले आहे. सांडव्यातून पाणी बाहेर सोडले जात आहे.
आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी व चित्रा नद्या धोक्याच्या पातळी बाहेरुन वाहत आहेत. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन तहसील विकास अहिर यांनी केले आहे.