सर्वात उंच ध्वजाच्या सन्मानार्थ कोल्हापूरात ३०३ किलो जिलेबी वाटप

By admin | Published: May 3, 2017 04:22 PM2017-05-03T16:22:12+5:302017-05-03T16:22:12+5:30

शिवांजनी सामाजिक फौंडेशनचा उपक्रम

303 kilo kilogram distribution in Kolhapur in honor of the highest flag | सर्वात उंच ध्वजाच्या सन्मानार्थ कोल्हापूरात ३०३ किलो जिलेबी वाटप

सर्वात उंच ध्वजाच्या सन्मानार्थ कोल्हापूरात ३०३ किलो जिलेबी वाटप

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 03 : भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या ३०३ फुटाचा ध्वज कोल्हापूरात उभारण्यात आला आहे. त्याच्या सन्मानार्थ शिवांजनी शैक्षणिक व सामाजिक फौंडेशनतर्फे सोमवारी ध्वजारोहणानंतर ताराबाई पार्क येथे ३०३ किलो जिलेबी वाटप केले.

दरवर्षी प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिनासह महाराष्ट्र दिनाला फौंडेशनतर्फे जिलेबी वाटप केले जाते. त्यानुसार यंदाही महाराष्ट्र दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुसरे औचित्य म्हणजे देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ३०३ फुटाचा ध्वज कोल्हापूरात उभारण्यात आला आहे. त्यामुळे ३०३ किलो जिलेबीचे वाटप करुन हा आनंद द्विगुणीत करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष अजित पवार, स्वप्निल पार्टे, महंमद सनदी, गणेश कांदळकर, किशोर पाटील, संदीप सावंत, गणेश कळके, दर्पण भाटे, भरत बेवीनकट्टी, दत्तात्रय कांबळे, सरीता इंगळे, भाऊसो पाटील, विनायक काकडे आदी उपस्थित होते. भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या ३०३ फुटाचा ध्वज कोल्हापूरात उभारण्यात आला आहे. त्याच्या सन्मानार्थ शिवांजनी शैक्षणिक व सामाजिक फौंडेशनतर्फे सोमवारी ताराबाई पार्क येथे ३०३ किलो जिलेबी वाटप केले. यावेळी अजित पवार, स्वप्निल पार्टे आदी उपस्थित होते.

Web Title: 303 kilo kilogram distribution in Kolhapur in honor of the highest flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.