चंदगड तालुक्यात 30.83 मिमी पाऊस,10 बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 01:08 PM2020-07-21T13:08:43+5:302020-07-21T13:15:31+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात चंदगड तालुक्यात 30.83 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. एकूण 10 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 49.17 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 87.992 इतका पाणीसाठा आहे.

30.83 mm rainfall in Chandgad taluka | चंदगड तालुक्यात 30.83 मिमी पाऊस,10 बंधारे पाण्याखाली

चंदगड तालुक्यात 30.83 मिमी पाऊस,10 बंधारे पाण्याखाली

Next
ठळक मुद्देअलमट्टीतून 46130 क्युसेक विसर्ग राधानगरीतून 800चंदगड तालुक्यात 30.83 मिमी पाऊस,10 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर: जिल्ह्यात काल दिवसभरात  चंदगड तालुक्यात 30.83 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. एकूण 10 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 49.17 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 87.992 इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 3.75 एकूण 200, शिरोळ- 3 एकूण 191.43 मिमी, पन्हाळा- 0.00 एकूण 582.71 मिमी, शाहूवाडी- 0.17 एकूण 851 मिमी, राधानगरी- 0.00 एकूण 872.17 मिमी, गगनबावडा- 0.00 मिमी एकूण 2231.50 मिमी, करवीर- 0.18 एकूण 449.73 मिमी, कागल- 4.14 एकूण 586.14 मिमी, गडहिंग्लज- 19 एकूण 421.14 मिमी, भुदरगड- 2.20 एकूण 700.80 मिमी, आजरा- 4.75 एकूण 961 मिमी, चंदगड- 30.83 मिमी एकूण 887.50 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

अलमट्टीतून 46130 क्युसेक विसर्ग राधानगरीतून 800; 10 बंधारे पाण्याखाली

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 152.32 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 800 तर अलमट्टी धरणातून 46130 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, शिरोळ व तेरवाड, भोगावती नदीवरील - सरकारी कोगे व खडक कोगे, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड असे एकूण 10 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 49.17 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 87.992 इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा

तुळशी 53.89 दलघमी, वारणा 607.68 दलघमी, दूधगंगा 462.58 दलघमी, कासारी 47.01 दलघमी, कडवी 38.03 दलघमी, कुंभी 47.91 दलघमी, पाटगाव 72.05 दलघमी, चिकोत्रा 21.91 दलघमी, चित्री 26.71 दलघमी, जंगमहट्टी 21.93 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.

 बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे

राजाराम 19.7 फूट, सुर्वे 18.10 फूट, रुई 47 फूट, इचलकरंजी 45 फूट, तेरवाड 43.6 फूट, शिरोळ 33.6 फूट, नृसिंहवाडी 29.6 फूट, राजापूर 18.6 फूट तर नजीकच्या सांगली 7.9 फूट व अंकली 9.2 फूट अशी आहे.


जिल्ह्यातीलबालिंगे शिंगणापूर मार्ग बंद

जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 1 राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-194 मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे. 

Web Title: 30.83 mm rainfall in Chandgad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.