महापालिका हद्दीत ३१२ नवे रुग्ण तर सहा जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:28 AM2021-04-30T04:28:57+5:302021-04-30T04:28:57+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत मागच्या चोवीस तासांत कोरोनाचे नवे ३१२ रुग्ण आढळून आले तर सहा जणांचा मृत्यू झाला. ...
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत मागच्या चोवीस तासांत कोरोनाचे नवे ३१२ रुग्ण आढळून आले तर सहा जणांचा मृत्यू झाला. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता १४९७ वर जाऊन पोहचली आहे. यातील अनेक रुग्णांवर घरातच उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर शहर कोरोना संसर्गाबाबत पुन्हा एकदा हॉटस्पॉट बनत चालले आहे. मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी सायंकाळी पाच या चोवीस तासांत शहरात सहा रुग्णांच्या मृत्यू, तर नवीन ३१२ रुग्ण आढळून आले. शहरात मागच्या चोवीस तासांत कोरोनाच्या ११९४ आरटीपीसीआर चाचण्या तर २६५ ॲन्टिजन चाचण्या करण्यात आल्या. कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण ११.८५ टक्के असल्याचे महापालिका उपायुक्त निखिल मोरे यांनी सांगितले.
बुधवारी शहरातील बाजार गेट १३, कैलासगडची स्वारी मंदिर १०, सम्राटनगर ८, जवाहरनगर १४, सुभाषनगर ८, फुलेवाडी, रिंगरोड ११, साळोखेनगर १०, आपटेनगर पाच, नाना पाटीलनगर सहा, सानेगुरुजी वसाहत चार, कनानगर सहा, तर कसबा बावड्यात सात रुग्ण आढळून आले.
शहरातील सानेगुरुजी, फुलेवाडी, राजारामपुरी, पोलिसलाईन, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, कनानगर, कदमवाडी, कैलासगडची स्वारी मंदिर, शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर, राजलक्ष्मीनगर, संभाजीनगर, रंकाळा तलाव या परिसरात गेल्या पाच सहा दिवसांत मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले आहेत.