गगनबावडा येथे 31.6 मिमी पाऊस, 2 बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 01:02 PM2021-06-24T13:02:19+5:302021-06-24T13:11:16+5:30

Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 31.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे 2 बंधारे पाण्याखाली आहेत.

31.6 mm rainfall at Gaganbawda, 2 dams under water | गगनबावडा येथे 31.6 मिमी पाऊस, 2 बंधारे पाण्याखाली

गगनबावडा येथे 31.6 मिमी पाऊस, 2 बंधारे पाण्याखाली

googlenewsNext
ठळक मुद्देगगनबावडा येथे 31.6 मिमी पाऊस, 2 बंधारे पाण्याखालीराधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 31.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे 2 बंधारे पाण्याखाली आहेत.

तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे 

हातकणंगले 0.4 मिमी, शिरोळ- निरंक, पन्हाळा 0.8 मिमी, शाहूवाडी- 7.6 मिमी, राधानगरी 3.1 मिमी, गगनबावडा-31.6 मिमी, करवीर- 1.1 मिमी, कागल- 0.3 मिमी, गडहिंग्लज- 0.3 मिमी, भुदरगड- 0.4 मिमी, आजरा 1.1 मिमी, चंदगड 0.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 88.66 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे 2 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 41.45 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 88.758 इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे.

तुळशी 51.76 दलघमी, वारणा 518.27 दलघमी, दूधगंगा 278.11 दलघमी, कासारी 29.86 दलघमी, कडवी 31.34 दलघमी, कुंभी 38.95 दलघमी, पाटगाव 49.77 दलघमी, चिकोत्रा 22.12 दलघमी, चित्री 33.64 दलघमी, जंगमहट्टी 14.65 दलघमी, घटप्रभा 42.97 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, आंबेआहोळ 15.69 दलघमी, कोदे (ल.पा) पुर्ण क्षमतेने भरला आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे

राजाराम 15.4 फूट, सुर्वे 18 फूट, रुई 44.3 फूट, इचलकरंजी 42 फूट, तेरवाड 39.6 फूट, शिरोळ 31.3 फूट, नृसिंहवाडी 31 फूट, राजापूर 19.6 फूट तर नजीकच्या सांगली 10 फूट व अंकली 10.6 फूट अशी आहे.

राजाराम बंधारा खुला पण वाहतुकीसाठी बंद

गेल्या १६ जुन पासुन पावसाने लावलेल्या संततधार हजेरी मुळे यावर्षी प्रथमच पाण्याखाली गेलेला राजाराम बंधारा बुधवारी खुला झाला मात्र बंधाऱ्यावरील स्लॅब वाहुन गेल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने आडथळे लावून बंद करण्यात आला.

Web Title: 31.6 mm rainfall at Gaganbawda, 2 dams under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.