जिल्ह्यात नवे ३१८ क्षयरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:21 AM2021-01-02T04:21:31+5:302021-01-02T04:21:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात केलेल्या ताज्या सर्वेक्षणामध्ये नवे ३१८ क्षयरुग्ण आढळून आले ...

318 new TB patients in the district | जिल्ह्यात नवे ३१८ क्षयरुग्ण

जिल्ह्यात नवे ३१८ क्षयरुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात केलेल्या ताज्या सर्वेक्षणामध्ये नवे ३१८ क्षयरुग्ण आढळून आले आहेत. अजूनही रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता असल्याने ३१ जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने १ डिसेंबरपासून संयुक्त क्षय व कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. १५ डिसेंबर २०२० चा आढावा घेतला असता, संशयित रुग्णांच्या १० टक्के रुग्ण हे शक्यतो प्रत्यक्षात आढळतात. परंतु सध्या हे प्रमाण ५.५ टक्के आहे. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश आले आहेत.

केवळ एका महिन्यात ३१८ क्षयरुग्ण आढळले असून, यातील ५९ रुग्णांना फुफ्फुस सोडून अन्य अवयवांना क्षयरोगाची लागण झाली आहे, तर ९८ जणांना थुंकीवाटे प्रसारित क्षयरोग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याचे लवकर निदान झाल्यामुळे इतरांना या रोगाचा संसर्ग होण्यावर मर्यादा आल्या आहेत. एक्सरेच्या माध्यमातून १५२ रुग्णांचे निदान करण्यात आले आहे.

चौकट

कोविडमुळे अधिक दक्षता

एचआयव्ही, कोरोना झालेले, कोरोनासंशयित आणि मधुमेह असलेल्या नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना क्षयरोग होण्याची शक्यता अधिक बळावते. गेले ९ महिने कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वजण प्रभावित झाले असताना, आता अन्य आजार होऊ नये, यासाठीही दक्षता घेण्याची गरज आहे.

कोट

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह होण्याचे प्रमाण वाढले आहे. मधुमेह असणाऱ्यांना अन्य आजार प्रभावित करतात, असे निरीक्षण गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे. त्यामुळे ज्यांना मधुमेह आणि ज्यांना दोन, तीन दिवस सलग खोकला लागत असेल, तर त्यांनी क्षयरोगाची तपासणी करून घेणे हिताचे आहे.

डॉ. उषादेवी कुंभार

जिल्हा क्षयरोग अधिकारी

चौकट

नव्या क्षयरुग्णांची तालुकावार आकडेवारी

अ. नं. तालुक्याचे नाव क्षयरुग्ण

१ करवीर २७

२ हातकणंगले ४७

३ भुदरगड २०

४ शिरोळ २७

५ गडहिंग्लज २६

६ पन्हाळा २०

७ कागल ३७

८ चंदगड २०

९ राधानगरी ३०

१० शाहूवाडी १६

११ इचलकरंजी २६

१२ गगनबावडा २२

टीप- यातील आजरा तालुक्यातील सर्वेक्षण केलेली लोकसंख्या चंदगड तालुक्यात समाविष्ट असून, करवीर तालुक्यातील भुये आरोग्य केंद्रांतर्गतची लोकसंख्या गगनबावडा व पन्हाळा तालुक्यात समाविष्ट आहे.

Web Title: 318 new TB patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.