३२ घरकुल लाभार्थी उघड्यावर
By admin | Published: October 22, 2016 12:47 AM2016-10-22T00:47:26+5:302016-10-22T01:32:51+5:30
करवीर पंचायत मासिक सभा : लाभार्थ्यांची जुनी घरे पाडली; संबंधितांवर कारवाई करा
कसबा बावडा : इंदिरा आवास घरकुल योजनेतील ३२ लाभार्थ्यांना घरे मंजुरीचे आदेश मिळाले. त्यानंतर संबंधित गावच्या ग्रामसेवकांनी जुने घर पाडण्याबाबत सूचना केल्या. सूचनेनुसार लाभार्थ्यांनी घरे पाडली; मात्र त्यानंतर प्रस्ताव आॅनलाईन न झाल्याने घरकुल निधी मिळणार नाही, अशी उत्तरे संबंधित विभागाकडून मिळाल्याने या योजनेतील लाभार्थी आपली राहती घरे पाडून घरकुलाविना रस्त्यावर आली आहेत. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत झाली. अध्यक्षस्थानी सभापती स्मिता युवराज गवळी या होत्या.
करवीर तालुक्यातील ३२ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाल्याचे पंचायतच्या विभागाकडून कळविण्यात आले. त्यानुसार संबंधितांनी आपली घरे पाडून, पाया खुदाई करून घर बांधणीस सुरुवात केली. या लोकांनी हातउसने पैसे घेऊन घराचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा अनुदान मिळण्यासाठी मागणी होऊ लागली, तेव्हा लाभार्थ्यांना ३१ मार्चला आॅनलाईन अर्ज न भरला गेल्याने अनुदानाचे पैसे मिळाले नाहीत. संबंधित लाभार्थ्यांनी याबाबत करवीर पंचायतकडे तक्रारी केल्या. परंतु त्यांना दाद मिळाली नाही. याला जे जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई करावी व त्यांच्याकडून व गटविकास अधिकाऱ्यांच्या पगारातून नुकसानभरपाईचे पैसे वसूल करावेत, अशी मागणी राजेंद्र सूर्यवंशी व दिलीप टिपुगडे यांनी केली. उपसभापती दत्तात्रय मुळीक व सचिन पाटील यांनी हा विषय उचलून धरत याबाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी सूचना केली.
शासनाने यंदा म्हणजेच जानेवारी महिन्यापासूनच जेव्हा ऊस पिकाला पाण्याची गरज असते, त्या काळात उपसाबंदी केल्याने ऊस पीक वाळून गेले. त्याचा फटका शेतकऱ्याला आता बसणार आहे. त्यामुळे शासनाने यंदा पाणीपट्टी माफ करावी, असा ठराव शुक्रवारच्या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
उचगावमधील जुनी अंगणवाडी पाडली आहे. नवीन अंगणवाडीचे काम रेंगाळले आहे, ते त्वरित करावे, अशी मागणी पूनम जाधव यांनी केली. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा एकही अधिकारी करवीर पंचायतच्या मासिक सभेस उपस्थित राहत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची नोटीस प्रशासनाने काढावी, अशी मागणी दिलीप टिपुगडे यांनी सहायक गटविकास अधिकारी ए. व्ही. केळकर यांच्याकडे केली. तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये चुकीचे काम करणाऱ्या ज्या ग्रामसेवकांवर तक्रार होती, असे ग्रामसेवक प्रशासनाने निलंबित केल्यामुळे दिलीप टिपुगडे यांनी प्रशासनाचे आभार
कुरुकली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजुरी
कुरुकली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजुरी मिळाली असून, निधीही मंजूर झाला असल्याची माहिती करवीरचे आरोग्य अधिकारी डॉ. जे. डी. नलवडे यांनी दिली. सध्या संबंधित गावात जागा मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रश्नही येत्या काही दिवसांत सुटेल, असेही ते म्हणाले. मानले.